पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३१२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. बडोदे संस्थानचा कारभार नेटिव लोकांचे हातीं देण्यांत मलीका मा अझमा राणी • साहेब यांनी सन १८५७ साळांत खंडेराव महाराज गायकवाड यांनी दिलेल्या रा. ज्यनिष्ठ मदतीबद्दल आपला चांगला अभिप्राय दाखवावा अशी इच्छा धरून त्यांची विधवा जमनाबाई महाराणी साहेब यांची विनंती मान्य केली आहे, व त्यांस गायक- वाडाचे घराण्यांतील जो मनुष्य हिंदुस्थान सरकार बडोदे संस्थानच्या गादींस योग्य आहे ह्मणून पसंत करील तो मनुष्य त्यांनी दत्तक घ्यावा अशी परवानगी आहे. • मलीका मा अझमा राणी साहेबांचे हुकूम अमलांत आणण्याकरितां ज्या गोष्टी करणें अवश्य आहेत त्या गोष्टी सदर हुकुमाप्रमाणे लागल्याच केल्या जातील. मध्यंतरी इंदूरचे महाराज यांची परवानगी मिळाल्यावरून सर माधवराव के. सी. एस. आय. हे एकदम बडोद्यास जातील व संस्थानचा कारभार मुख्य दिवाण या हुद्यानें ग वरनर जनरल यांचे बडोदे येथील एजंट व स्पेशल कमिशनर यांजपासून ज्या मिळतील त्या अन्वयें चालवितील. बडोदे संस्थानांतील राजसत्ता देण्याचे कामांत ब्रिटिश सरकार व बडोद्याचे गा- कवाड यांजमध्ये जे तहनामे झाले आहेत त्यामध्ये फेरफार होणार नाहींत, व बडो- द्याचे गायकवाडांस अल क्यानिंग साहेबांनीं मार्च ता० ११ सन १८६२ इसवी रोजी दिलेल्या सनदेत जे अधिकार व हक्क आहेत त्यांचा नवीन गायकवाडास ठ पभोग मिळेल. व्हाइसराय गवरनर जनरल आफ इंडिया इनकौन्सिल यांचे हुकुमावरून. सी. पु. एचिनसन. हिंदुस्थान सरकारचे सेक्रेटरी. जाहिरनामा प्रसिद्ध केल्यावर तारीख २२ एप्रिल सन १८७५ रोजीं गुरुवारी सं ध्याकाळी साहा वाजतां श्रीमंत मल्हारराव महाराज गायकवाड यांस बड़ोदें येथून काढलें व दुसरे दिवशीं शुक्रवारी मद्रास येथे नेऊन ठेविलें. ह्या हतभाग्य प्राण्यास सान्या जन्मामध्ये सुखाचे दिवस फार थोडेच होते. त्याच्या बंधूनीं त्यास सात वर्षे कारागृहांत ठेविलें होतें. राजगादीवर आल्यानंतर जमनाबाईसाहेब गरोदर आहेत हे प्रसिद्धीस आल्यामुळे त्या प्रसूत होईपर्यंत त्यास राज्य प्राप्तीविषयीं आशा नव्हती. पुढे कांहीं स्थिर. स्थावर झाले न झालें तो कर्नल फेर रेसिडेंटाच्या हुद्यावर येऊन थडकले, आणि तेव्हांपासून तर त्याच्या अपकर्ष दशेस आरंभ झाला आणि शेवटी त्याच्या मजेपुढे त्याची अप्रतिष्ठा होऊन व जगांत दुर्लौकिक होऊन त्यास पुनः जन्मपर्यंत कारागृहवा. सांत राहण्याचा प्रसंग आला. वीस लक्ष प्रजेचा राजा आणि दाहा हजार फौजेचा अधिपती जेव्हां बडोद्यांतून काढला तेव्हां कोणास समजूं देखील दिले नाहीं, हैं. इंग्रज सरकारचे सामर्थ्य आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे चातुर्य !! बडोद्यापासून मद्रा- सेपर्यंत प्रत्येक स्टेशनावर फार कडेकोट बंदोबस्त ठेविला होता, त्यांतही पुण्याच्या स्टेशनावर फारच सावधगिरी ठेविली होती असें ह्मणतात. कारण महाराष्ट्र देशांतील