पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. (३११) यांजवर अपराध शाबीत झाले आहेत असे मानून त्यास गादीवरून दूर करणे हे योग्य नाहीं. त्यांनी राज्यकारभार वाईट रीतीने चालविला व पुढे चांगल्या रीतीनें चाल- वितील अशी आशा नाहीं, यासत्रने त्यांस पदच्युत करावें; आणि त्याप्रमाणे हिंदुस्था- न सरकारांनीं तारीख १९ एप्रिल सन १८७५ रोजीं खालीं लिहिल्याप्रमाणे जा- हिरनामा प्रसिद्ध केला. सर्व लोकांस या जाहिरनाम्यावरून असें जाहिर करण्यात येतें की:- बडोदे संस्थानांतील ब्रिटिश सरकारचे माजी वकील कर्नल आर फेर सी. बी, यांस विषप्रयोग करण्याचे कामास महाराजा मल्हारराव गायकवाड यांनी फूस दिली ह्या आरोपाचे खरेपणाविषयीं उघड रीतीने चौकशी करावी आणि वरील संशयांतून मुक्त होण्यास महाराजांस हरएक प्रकारची संधी मिळावी, ह्मणून त्यांस अधिकारापासून तूर्त दूर केलें होतें, व ब्रिटिशसरकाराने बडोदे संस्थानचा कारभार आपल्या हाती कांहीं वेळ घेतला होता. कमिशनापुढे झालेली चौकशी पूर्ण झाल्यावर बडोदे संस्थानांतील राज्यकारभार चालविण्याचा अधिकार मल्हारराव महाराज गायकवाड यांस फिरून द्यावा किंवा नाही याचा विचार राणी सरकारांनी केला आहे. कमिशनर लोकांमध्ये मतभेद झाल्यामुळे त्यांच्या पुढे झालेल्या चौकशीवरून किं वा त्यांनी केलेल्या रिपोर्टीवरून राणीसरकारांनी आपला शेवटचा अभिप्राय दिला नाहीं व त्या चौकशीच्या अंती महाराजांवर आलेल्या संशयांत खरेपणा आहे असें- ही ते समजत नाहीत. तथापि मल्हारराव महाराज गायकवाड गादीवर बसल्यापासून ह्या वेळपर्यंत बडोदे येथील हकीकतीच्या संबंधाने सर्व स्थितीकडे लक्ष देऊन व महाराजांची जगजाहीर गैरवर्तणूक, व संस्थानची फार वाईट राज्यव्यवस्था, व ज्या सु- धारणा करणें जरूर आहेत त्या अमलांत आणण्याचे कामांत त्यांचा उघड नालायक- पणा, व महाराजांस राज्यकारभार फिरून देणें हें बडोद्यांतील लोकांस अतिशय अ नहितकारक होईल, व बडोदे संस्थान व ब्रिटिश सरकार यांजमध्ये जे संबंध राहवे ते राहण्यास याजपासून विरोध येईल, असे हिंदुस्थानसरकारचें मत लक्षांत आणून राणी सरकारांनी असा ठराव केला आहे कीं, बडोद्यांतील राज्याधिकारापासून म ल्हारराव महाराज गायकवाड यांस दूर करावे व तत्संबंधी हक्क व मानमरातब हे आजपासून त्यांस व त्यांच्या संततीस मिळू नयेत. सदरील हुकुमाप्रमाणे व्हाइसराय व गवरनर जनरल आफ इंडिया इनकौन्सिल हे ह्या जाहिरनाम्यानें असे प्रसिद्ध करतात की, बडोदे संस्थानांतील राज्यसत्तेपासून मल्हारराव महाराज गायकवाड यांस दूर केलें आहे आणि त्यांस व त्यांच्या संततीस तःसंबंधी हक्क, मानमरातब व- गैरे हे मिळू नयेत. ब्रिटिश हिंदुस्थानांत हिंदुस्थान सरकारच्या संमतीने एखादी जागा पसंत करून मल्हारराव यांस त्यांच्या कुटुंबासह व योग्य इतमामासह तेथे राहू दिले जाईल व त्यांस बडोदे संस्थानांतील उत्तन्नांतून खर्चाकरितां योग्य नेमणूक केली जाईल.