पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोपाळराव मैराळ यांची दिवाणगिरी. राव साहेब यांचा विश्वास काय तो भाऊ खेडकर यांजवर होता. कर्नल बार साहेब यांच्या शिफारशीवरून काठेवाड पोलिटिकल एजन्सीचे माजी दप्तरदार राव साहेब बापू- भाई दयाशंकर यांची मल्हारराव महाराज यानीं रावसाहेब यांच्या हाताखाली योजना केली होती, परंतु त्या सद्गृहस्थास आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा बडोद्याच्या दरबारास देण्याची सवड मिळाली नाही, त्यामुळे त्यापासून कांही विशेष अर्थ उत्पन्न झाला नाही. भाऊ खेडकर यान फडणिशीचें काम पुष्कळ वर्षे केले होते, त्यामुळे त्यांस फडणि- शीच्या दप्तराची माहिती होती असा कांही लोकांस भ्रम होता, व ते मोठे शहाणे असे लोक मानीत असत, परंतु राज्यकारभाराची सर्व जोखम डोक्यावर घेऊन राजनीति जाणत्या लोकांनी प्रशंसा करावी अशा रीतीने कारभार करण्याची त्यांची मुळींच शक्ति नव्हती. त्यांचा स्वभाव मनस्त्री उतावळा, तुसडा व खुनशी असे; आणि त्यांची महत्वाकांक्षा इतकी अनावर होती की, त्यांजकडे मोठा अधिकार असतांही त्यांचे चित्तास कधीही समाधान झाले नाही. दरबारांतील कामदारांबरोबर त्यांचे चांगले जमत नसे. हरीबा गायकवाड आणि त्यांचे कारभारी नारायणभाई तर त्यांजला मनस्वी प्रतिकूळ होते, त्यामुळे त्यांचा कोणताही कार सिद्धीस जात नसे. सारांश त्यांस हातीं धरल्यापासून गोपाळराव मैराळ यांस कांही फायदा झाला नाहीं, पण जे कामदार त्यांचे महत्व ठेवीत होते तेच त्यांची भाऊच्या संगतीमुळे अवज्ञा करूं लागले. मल्हारराव महाराज यांच्याच उद्देशाप्रमाणे पाहिले असतां ही दिवाणागेरीची योजना त्यानीं मोठ्या दक्षतेने केली होती. त्यांच्या राज्यास बुक्ता आरंभ झाला होता, त्यामुळे आपल्या मेहेरबानींतील मनुष्यास एकदम इतक्या मोठ्या अधिकारावर चढविणें त्यांस शक्य व योग्य वाटले नाहीं. त्यांस निजतंत्रानुवर्ति, सभ्य, कीर्तिमान, कुलीन, आणि लोक- प्रिय अशा नामधारी दिवाणाची गरज होती, आणि राव साहेब यांजखेरीज बडोद्यांत तसा दुसरा कोणी नव्हता. महाराजांचे मनांत मुख्यत्वेंकरून त्यांचा जिवलग मित्र बळ- वंतराव राहुरकर याचे महत्व वाढवून सर्व राज्यकारभार त्याचे हातानें चालवावयाचा होता. .