पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. • सदहूप्रमाणें गवरनर जनरल यांचा ठराव असून त्यांनीं तारीख १५ एप्रिल सन १८७५ रोजीं नामदार स्टेट सेक्रेटरी साहेब यांस पत्र लिहिले आहे. त्यांतील बावि साव्या कलमांत असे लिहिले आहे की, कमिशनर यांचे अभिप्राय आणि ज्या पुरा- व्यावर त्या अभिप्रायांचा आधार आहे तो पुरावा है आह्मीं लक्ष्यपूर्वक अवलोकनांत आणले. त्यावरून मल्हारराव गायकवाड याजवर ठेविलेले आरोप शाबीत आहेत या सिद्धांताखेरीज दुसरा कोणताच सिद्धांत आमच्यानें करवत नाहीं; व मल्हारराव मां- च्या निरपराधीपणाबद्दल जीं कारणे सांगितली आहेत त्यांचा घडून आलेल्या गोष्टीं- शीं मेळ घालतां येत नाहीं. या मुकदम्याच्या संबंधाने काही पोलीसचें होते किंवा शवजी आणि नरसू यांनी आपला स्वतांचा कांहीं हेतु साधण्यासाठीं ● किंवा भाऊ पुणेकर, दामोदरपंत किंवा गायकवाडाचे शत्रू यांच्या उसकेरणीवरून गा- यकवाडांस कांही माहीत नसतां हें पातक करण्याचा प्रयत्न केला होता की काय याविषयीं आह्मी पोक्त विचार केला, परंतु अशा कल्पना करण्यास काही पुरावा नाही इतकेच नाही पण त्यांपैकी एकही कल्पना जर गृहीत केली तर त्यापासून अ संभवनीयतेची अशी एक जबर मालिका उप्तन्न होते कीं, तशा कल्पना मनांत आणतांच येत नाहीत. तेविसाव्या कलमांत त्यांचें ह्मणणे असे आहे कीं, जरी आह्मी कदाचित् ज्या कमिशनरांनी मल्हारराव गायकवाड यांवर दोष लागू होत नाहीत असा अभिप्राय दिला आहे त्याशीं एकमत झालों तरी मल्हारराव गायकवाढ यांजवर अतीशय संशय राहतो आणि त्यास त्यांच्या पूर्वीच्या आचरणावरून आणि आझी या पत्रांतील कलम २ तागाईत कलम ८ यांजमध्यें घडून आलेल्या गोष्टींची मालिका सांगितली आहे त्यावरून बळकटी आली आहे; तेव्हां त्यांस पुनः गादीवर बसविणे हैं सर्वथैव अशक्य आहे. कोणतीही आट करून त्यांस गादीवर बसविले असता न्या याचे उल्लंघन केलें व राजकीय संबंधी एक मोठी घातक चूक केली असे होईल, आणि येणे करून हिंदुस्थानांतील ब्रिटिश सरकारच्या आणि देशी राजांच्या दरबा शंतील रोसडेंटांच्या अधिकारास मोठा धक्का बसेल. मल्हारराव महाराज यांस अपराधाबद्दल शासन करावे किंवा नाही त्याविषयी कलम २४ यांत असे लिहिले आहे की, आह्मी या मुकदम्यासंबंधी सर्व गोष्टी वि चारांत घेतल्या त्यावरून आमचे विचारास असे येतें कीं, नेटिक कमिशनर यांनी मल्हारराव गायकवाड यांस अनुकूल अभिप्राय दिला आहे व त्यांच्या मनांत त्यांजवि- षयीं कारुण्य आहे सबब त्यांच्या भीडमुरवती खातर मल्हारराव गायकवाड यांस दुसरे कांहीं शासन न करितां पदच्युत करून व त्यांच्या वारसाचा गादी वरील हक्क रद्द करून त्यांस ब्रिटिश सरकारच्या मुलुखांत दाबांत ठेवावें आणि बडोद्याच्या जमे तून त्यांस योग्य नेमणूक द्यावी. * नामदार स्टेट सेक्रेटरी यांनी हिंदुस्थान सरकारास अशी सूचना केली कीं, ने- टिव कमिशनर यांचे अभिप्राय भिन्न पडले आहेत, यास्तव मल्हारराव गायकवाड

  • पहा ब्ल्यू बुक नं० ५ पान ७ कलम २२-२३-२४.