पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. (३०९) डाच्या बारिष्टरानें अथवा कमिशनरांनी याबद्दल कोणताही प्रश्न विचारला असता तर पोलिस कामगारांनी अथवा त्या लोकांनी त्याचें उत्तर खचित दिलें असतें. ५४ तारखांच्या संबंधाने जे विरोध आहेत त्यांजवर काय तो सर दिनकरराव यांचा कटाक्ष आहे, व रावजी आणि दामोदरपंत यांच्या पुराव्याची तुलना करून. त्यांत कांही विरोध दाखविला आहे; परंतु इंडियासरकारास त्यांत कांहीं विरोध आहे अर्से वाटत नाही. ५५ पुरावा तपासल्यावरून इंडिया सरकारची अशी खातरजमा झाली आहे कीं, तीन कमिशनरांनी एकमत होऊन जो अभिप्राय दिला आहे तो अगदीं वाजवी आहे, आणि महाराजा शिंदे व सर दिनकरराव यांनी ज्या शंका घेतल्या आहेत आणि नयपूरच्या महाराजांनीं जो खास अभिप्राय दिला आहे तो मान्य करवत नाही. का. रण कीं, जो पुरावा झाला आहे त्यांत असा कहीं विरोध अथवा दुर्ज्ञेयपणा नाही कीं, तो पुरावा अश्रद्धेय मानावा विरुद्ध पुरावा तर कांहीं एक नाही आणि गायक- वाडाचे सलागार लोक गायकवाडाचा निरपराधीपणा शाबीत करण्याकरितां लाच्या एजंटास कोर्टा समोर आणण्यापासून दूर राहिले. गायकवाडांच्या बारिष्टरानें धीट- पणाने असे सांगितलें कीं, गायकवाडाच्या तर्फे पुरावा आणण्याची कांहीं एक गरज. नाही. परंतु या संबंधानें इंडियासरकार यांच्या विचारास निराळेच येतें.- याजवर जो संशय उत्पन्न झाला होता यांतून मुक्त होण्याची त्यांस संधी द्यावी हा या चौकशीचा मुख्य मुद्दा होता. प्रामाणीकपणाने शक्य होतें तर गायकवाडाच्या मसलतदारांनी हा मुकदमा हाणून पाडावयाचा होता, आणि त्याच्या विरुद्ध जो मजबूत पुरावा झाला होता त्याचें खंडन करावयाचे होते. त्यांच्या अक्षम तेरेखेरीज पुरावा न आणण्याचें दुसरें कांहीं कारण दिसत नाहीं. कमिशनापुढे जो पुरावा झाला आहे त्या विरुद्ध कांहीं एक उपपत्ति नाही. हे खरे आहे कीं, दामोदरपंत अथवा भाऊ पुणेकर याने विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला असावा अशी गायक- वाडाच्या व्यारिष्टने सूचना केली आहे, परंतु त्याबद्दल पुराव्याचा लेश देखील नाहीं. गायकवाड ५६ यास्तव हिंदुस्थान सरकारास मोठ्या नाखुषीनें असा निश्चयाचा अभिप्राय: देणे भाग पडतें कीं, गायकवाड यांजवर जे आरोप आणले होते ते चौकशी केल्या. वरून लागू झाले आहेत. आणि त्यांनी उसकेरणी केल्यावरून रावजी आणि नरस यांनी कर्नल फेर यांस विषप्रयोग केला.. • सिमला-फारिन डिपार्टमेंट पोलिटिकल. ता० २१ ए मिल सन १८७५. गवरनर जनरल यांच्या हुकुमावरून. एचिन्सन. सेक्रेटरी नि० इंडियासरकार..