पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३०८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. गेली असावी अथवा त्यांस तो निरनिराळी मासळी असावी; कारण ह्या संभाषणांत सालम व येशवंतराव हे दोघेजण बोलत होते. आतां ह्या दोन इसमांनी ही गोष्ट रचली असावी अथवा कोणी तिन्हाईत मनुष्यांनी ही गोष्ट रचून साक्षीदारांस शि. कविली असावी अशी जरी कल्पना केली, तथापि एक लक्ष रुपये बक्षीस मिळण्या- बद्दलची साधी व सोपी गोष्ट हे इसम ज्या वेळेस साक्ष देण्यास आले त्या वे ळेस त्यांच्या लक्ष्यांत राहिली नसावी अशी कल्पना करणे मोठे कठीण आहे. ५१ जयपूरचे महाराज यांचे ह्मणणे असें आहे की, दामोदरपंत याच्या ताब्यांतील खानगा कचेरीच्या दप्तरांतील ज्या यादी पुराव्यांत दिल्या आहेत त्यांवरून हिरे अथवा कोणत्याही प्रकारचें बीष खरेदी करण्याकरितां अमुक एक रकम दिली असे दिसून येत नाहीं. ते ह्मणतात:- " ह्या यादींत ज्या रकमा लिहिल्या आहेत या ब्राह्मणभो- जनाबद्दल व दुसन्या धार्मिक आणि उपयुक्त कृत्यांबद्दल खर्च केल्या ह्मणून लिहिले आहे. आणि त्या रकमा त्याच कृत्यांकडे खरोखर खर्च झाल्या असा मजबुत पुरावा आहे. " टी निशाणीच्या कागदावरून जयपूरच्या महाराजांचा असा ग्रह कसा झा- ला याविषयीं इंडिया सरकारच्यानें कांहीं सांगवत नाहीं. हिंदुस्थान सरकारची सम- जूत अशी झाली आहे कीं, जी गोष्ट छपवावयाची होती त्यासाठीं गायकवाडाच्या हिशेबांत खोट्या रकमा लिहिल्या आहेत; आणि टी निशाणीच्या यादींत ब्राह्मणभो- जनाबद्दल ह्मणून जी रकम खर्च लिहिली आहे, आणि ती रकम ज्यास दिली ह्मणून लिहिलें आहे त्या ब्राह्मणानें कोर्टापुढें साक्ष दिली आहे कीं ती रकम मला कधीं दिली नाहीं. ब्राह्मणभोजनाबद्दल त्यास जी रकम दिली त्यामध्यें आणि निशाणी टी चे यादींत लिहिलेल्या रकमेमध्यें त्या साक्षीदारानें तफावत दाखवून दिली आहे. दुसरें टी निशाणीच्या यादींत जी रकम लिहिली आहे ती आर आणि एस या नि. शाणींच्या यादींत जी रकम नानाजी विठ्ठल जवाहीरखान्याचा उपरी यास दिली झ, णून लिहिले आहे त्या रकमेशी अगदी बरोबर मिळते. यावरून हिशेबांत खोटा खर्च लिहून ह्या रकमा दृष्टोत्पत्तीस येऊ देऊं नयेत असा उघड उद्देश होता असे दिसतें. आणि जो हिशेब जयपूरच्या महाराजांस आपल्या मताच्या दाढीस बळकट वाटतो तो हिशेष उलढा दामोदरपंत याच्या पुराव्यास बळकटी देतो असें इंडिया सरकारास वाटतें. ५२ जयपूरच्या महाराजांचें दुसरें असें म्हणणे आहे कीं, कर्नल फेर यांस वि. षप्रयोग केला त्यांत तांबें होते असे सांगण्यांत आले असून तत्ववेत्यांच्या तपासांत तें सांपडळे नाही; परंतु हे म्हणणे पुराव्यास अनुसरून नाहीं. याविषयीं असें दिसून येतें कीं, भाऊ पुणेकर यानें ऐकिलेली गोष्ट कर्नल फेर यांस सांगितली होती कीं, तुझास विषप्रयोग केला त्यांत तांबें मिश्र केलें होतें. ५३ सालम आणि येशवंतराव यांनी मुंबईच्या पोलिसा समोर कांहीं हकीकत सांगि तली आहे किंवा नाही याचा पत्ता लाविण्यास काहीं साधन नाहीं असे जयपूरचे महाराज कोणत्या कारणाने ह्मणतात तें इंडिया सरकारास समजत नाहीं. गायकवा.