पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. (३०७ ) रोतीनें खोटें पाडलें असतें. आणि ही गोष्ट त्याव्या हातून झाली असती किंवा माही है गायकवाड यांस माहित होतें. ४७ विष वेळोवेळीं फार थोडे दिले गेलें व एकंदर ही गोष्ट पुष्कळ दिवस चा. लली याविषयीं महाराज शिंदे यांस थोडीशी हरकत वाटते. ह्या संबंधानें प्रथमत अशी गोष्ट सुचते कीं, विषप्रयोगाच्या संबंधानें जी जी कल्पना बसवावी त्या त्य कल्पनेस ही शंका सारखीच लागू पडते. कारण हैं अगदी स्पष्ट आहे कीं, नोवेंबर ता० ९ रोजी पुष्कळ विष दिले असावें. अशा रीतीनें ही गोष्ट का झाली हा खुलासा रावजीने बराच केला आहे; कारण तो असें म्हणतो कीं, एखादा परिणाम लवकर घडून आला असता ही सर्व गोष्ट उघड होईल अशी मला भीति होती. हा प्रकार एकंदर किती दिवस चालला होता हैं बरोबर कळत नाहीं. कारण त्यास आरंभ कधीं झाला हे निश्चयाने ठरावेतां येत नाहीं. परंतु झालेल्या पुराव्यावरून अनुमान केले असता असे दिसतें कीं, हा प्रकार सहा किंवा सात आठवडे सुरू हो- ता. ज्या गोष्टीस फार युक्ति लागते, संधी मिळण्याची वाट पहात बसावें लागतें, व ज्याच्या हातीं तें काम सौंपविले असते त्याच्या हातून तें न झाल्यास त्यास मो- कळीक द्यावी लागते, अशा गोष्टीस इतका वेळ फार आहेसे वाटत नाहीं. ४८. नंतर असे लटले आहे कीं, हिरे, सोमल अथवा मोरचूत यांच्या खरेदी बद्दल पुरावा झाला नाही. व यासंबंधी कोणत्याही कागदावर गायकवाडाची सह नसल्यामुळे गायकवाड याजवर दोष लागू होत नाही. परंतु एकेचाळीस व पंचे। चाळीस कलमांत पूर्वीच दाखविले आहे कीं, अशा प्रकारची खरेदी शाबीद कर. ण्याची जरूरी नाही. गायकवाद पांच्या सहीच्या कागदाच्या संबंधानें अशी गोष्ट आहे कीं, ह्या प्रकारच्या खटल्यांत कोर्टासमोर असे कागद यावे हैं अगदीं असं- भवनीय आहे. खरोखर असे कागद ह्या खटल्यांत हजर होतील असें हिंदुस्थान सरकारास मुळींच वाटले नव्हते. ४९. जयपूरचे महाराज व सर दिनकरराव यांस पुरावाच्या संबंधानें ज्या हरकती वाटत आहेत त्या व महाराज शिंदे यांस वाटलेल्या हरकती एकंदरीनें मुळ सारख्याच आहेत, व त्यांपैकी पुष्कळांच्या संबंधानें पूर्वी टीका केलीच आहे. परंतु आणखी कांहीं कच्ची हकीकत दिली आहे व त्यांत पुराव्याच्या संबंधाने कांहीं मह त्वाच्या हरकती आहेत असे वाटतें. ५०. गायकवाड यांनी मला व नरसूस एक एक लक्ष रुपये देण्याचें कबूल के- लें होतें ही, रावजीने सांगितलेली हकीकत व गायकवाद फक्त पोकळ वचनें देत असत ही नरसूनें सांगितलेली हकीकत जयपूरचे महाराजांस मोठी महत्वाची वाट ते. आतां हिंदुस्थान सरकारास ज्या फरकांवरून ह्या दोन साक्षीदारांनी मसलत करून जबानी दिली नाहीं असे वाटतें त्याच फरकांपैकी हा एक फरक आहे. यांत मुद्याची गोष्ट इतकीच आहे कीं, बक्षीस देण्याचें कबूल केले होतें. हें बक्षीस को- णत्या प्रकारचें असावें ही गोष्ट या दोन इसमांस निरनिराळ्या रीतीने सांगितली