पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३०६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. शी लागू पडते हे हिंदुस्थान सरकारास कळत नाहीं. पेद्रोच्या संबंधाने असे आ. हे कीं, त्याजवर रावजीनें आरोप आणला व ह्या कटांतले आपले अंग तो अगदी नाकबूल करतो. यास्तव कटाच्या संबंधानें रावजीचा व त्याचा विरोध आहे व ह्यापैकी खरी हकीकत कोण सांगतो हे सांगणे सोपें नाहीं. विषप्रयोगाच्या संबंधानें तो गायकवाडांवर आरोप आणीत नाहीं. परंतु ह्याशिवाय कोणत्याही रीतीने त्या- ची जबानी गायकवाड यांस हितावह नाहीं. गायकवाड व रोसडेन्सींतील नौकर माणसें यांमध्ये व्यवहार होता ह्मणून जो रावजीनें मजकूर सांगितला आहे त्यास हा साक्षीदार उलटी बळकटी आणतो. गायकवाडांपासून मला पैसे मिळाले असें ही कबूल करतो व ह्याचें कारण त्या वेळेस एखादा उत्साह नव्हता व दुसरी कांहीं एक गोष्ट नव्हती; करितां सालीम आग्रह करीत असतां ही भेटण्यास जाण्याचें याणें नाकारिले ह्मणून त्यास गायकवाडांस भेटण्याची इच्छा व्हावी याशिवाय दु सरें कांहीं कारण दिसत नाहीं. १ ४५. फिरून महाराजांचें असें ह्मणणे आहे कीं, सालम, यशवंतराव, खानवेलकर गुजाबा, नुरुद्दीन बोहरी आणि हकीम इतक्या लोकांची साक्ष न घेणे म्हणजे गा- यकवाडांस हितावह आहे. ह्या इसमांत काही फरक केला पाहिजे. नुरुद्दीन बोहरी हा औषधे विकणारा मनुष्य होता व दामोदरपंत असे म्हणतो कीं, जे विष कर्नल फेर साहेबांस दिलें तें याजपासून विकत घेतलें. ह्या खटल्यांत नुरुद्दीन बोहरी निर- पाराधी नव्हता असे म्हणणे नाहीं. दामोदरपंत यानें सोमल विकत घेतला किंवा नाहीं; येवढ्याच मुद्यावर याची जवानी झाली असती. हा सोमल खरेदीचा मजकुर दामोदरपंतानें सांगितला आहे, पण तो मह वाचा नाहीं असें वर सांगितले आहे. हा मजकूर त्याने साद्यंत सांगितला व त्याची जी किंमत असावयाची ती आहे. मीं नुरुद्दीनापासून सोमल विकत घेतला हे त्याचें म्हणणें यास बळकटी आणणारा दुस- रा पुरावा नाहीं. जर गोष्ट महत्वाची असती तर शाबीत करण्याकरतां नुरू- दीनाची साक्ष घेतली असती; व ज्याअर्थी ही त्याची जबानी झाली नाहीं त्या अर्थी ही खरेदी शाबीत झाली नाही असे म्हणून गायकवाड यांस फायदा द्यावा हें बरें. ह्याच्या पलीकडे नुरुद्दीनाची साक्ष न घेतल्यामुळे खटल्यास बाध येत नाहीं. ४६ दुसऱ्या साक्षीदारांच्या संबंधाने ही गोष्ट अगदीं निराळी आहे. सालीम व येशवंतराव यांच्या संबंधानें कशी स्थिति आहे हें आह्मी पूर्वी सांगितलेंच आहे. ते साक्ष देण्यास आले नाहीत यावरून येवढेच निष्पन्न होतें कीं, गायकवाड यांस त्यां- ची भीति वाटत होती; कारण त्यांस पक्केपणीं असे माहित होते कीं, सर्व खरी हकीकत त्यांस माहित आहे. हीच गोष्ट थोडक्या अंशानें खानवेलकर, गुज्याबा व हकीम यांस लागूं आहे. विखारी पदार्थ कसे पैदा केले ही जी क्षुल्लक गोष्ट या संबंधाने फक्त या साक्षीदारांस मजकूर सांगतां आला असता. गायकवाड व यांचा अतिनिकट संबंध होता व कर्नल फेर यांच्याविरुद्ध झालेल्या बंडांत हे सर्व इसम होते असें दामोदरपंत सांगतो. हे जर खोदें असतें तर त्यांनीं हे त्याचें बोलणे नीट