पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गव्हरनर जनरल यांचा ठराव. (३०५ ) ह्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे व हा खुलासा “ कांहीं विषारी पदार्थ तयार करण्याकरता गायकवाडांस हिरे पाहिजे होते " ह्मणून दामोदरपंत ह्यानें जी हकीक- त सांगितली आहे त्याशिवाय इतर रीतीने झाला नाहीं. ४९. ज्या दोन गोष्टी शाबीत करण्याकडे दामोदरपंताच्या जबानीचा झोंक आहे ते दोन मुद्दे असे आहेत कीं, सोमल विकत घेणे व काही ठिकाणी हिरे खरे. दी करणे. ह्यांपैकी पहिल्या मुद्यावर, ज्या तीन कमिशनरांनी एके ठिकाणी रिपोर्ट केला आहे त्यांचें असें मत आहे कीं, ही गोष्ट संभवनीय आहे; व दुसऱ्या मुद्यावर त्यांचा अभिप्राय असा आहे कीं, ही गोष्ट शाबीत झाली आहे. ह्या दोन मुद्यांस हिंदुस्थान सरकारच्याने विशेष महत्व देववत नाहीं. गायकवाडांस हवे तितके हिरे व पाहिजे तितका सोमल मिळविण्याचे कामांत कांहीं पंचाईंत पडली असती असें हिंदुस्थान सरकारास कधीच वाटलें नाहीं; व त्यांचे मत असेही आहे की जर दामो- दरपंतानें ह्या दोन गोष्टीविषयीं जी हकीकत सांगणे होती ती खुषीने सांगितली ह्म- णूनच त्यांच्या वकिलानी ह्या दोन गोष्टी सिद्ध करण्याची मेहनत घेतली असावी. परंतु जो पुरावा हिंदुस्थान सरकारापुढे ठेविला व ज्याच्यावरून त्यांनी ही चौकशी चालविली व जो कायम राहिला असतां गायकवाड दूषित ठरेल असे त्यांस सांगित- लें होते त्यांत दामोदरपंताची जबानी नव्हती. ४२. ज्या तीन कमिशनरांनीं निरनिराळी आपली मते दिली आहेत त्यांस असें वाटतें कीं, विषप्रयोगाच्या खटल्यांत झालेला पुरावा इतका व्यंग आहे की, त्याच्या- वरून गायकवाडांवर आलेला आरोप खरा वाटत नाहीं व असे वाटण्यास त्यांचीं काय कारणे आहेत ह्यांचा विचार करणे जरूर आहे असे हिंदुस्थान सरकारास आ तां वाटतें, ४३, महाराज शिंदें यांचें असें ह्मणणे आहे कीं, ह्या खटल्याशी ज्या पुष्कळ लोकांचा संबंध आहे त्यापैकी रावजी, नरसू, व दामोदरपंत यांनी ह्या संबंधाने साक्षी दिल्या आहेत व त्यांनी सांगितलेली हकीकत अगदीं जुळत नाही. परंतु महा- राजांनीं अमिनाच्या साक्षीकडे दुर्लक्ष केलें आहे व ह्या साक्षीचा सर्व खटल्याशी फार संबंध आहे. सर्व साक्षीदार एकमेकांशीं न जुळणारी हकीकत सांगतात, ह्या संबंधाने हिंदुस्थान सरकारास, एकपक्षी रावजी व नरसू व दुसरे पक्ष दामोदरपंत यांच्या हकीकतींत काय फरक आहे हे स्पष्ट समजत नाहीं. वर सांगितल्याप्रमाणें रावजी व नरसू यांच्या हकीकतींत जो फरकं आहे त्याच्या योगानें मुख्य गोष्टीस बाध येत नाहीं. एकाद्या गोष्टीबद्दल प्रत्यक्ष पुरावा देण्यांस फक्त चार किंवा तीन साक्षी. दार आहेत, एवढीच गोष्ट तो पुरावा भरंवशालाक नाही अथवा कमजोर आहे असे करीत नाहीं. ह्या पुराव्याची कडक रीतीनें परिक्षा पाहिली पाहिजे व ह्या नंतर जर तो टिकला तर साक्षीदार पुष्कळ नाहीत ह्मणून तो टाकाऊ समजतां येत नाही. ४४. नंतर महाराज असें ह्मणतात कीं, पेद्रो व अबदुला [ नंबर १७ चा सा- क्षीदार ] हे आरोपीच्या तर्फेचे आहेत. ह्या मुद्यावर अबदुला याची जबानी क