पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३०४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. यकवाड यांनी शोध केला. स.हेबांस काहीएक खाण्यास देऊ नका अशी तिनें सूचना केली. षांत साहेबांस म्हणजे कर्नल फेर यांस असा अर्थ आहे. ३८ गायकवाड यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी दामोदरपंत याची ही जबानी विसरतां कामास नाही. या साक्षीदाराची स्थिति मोठी वाईट आहे. कारण तो स्वतांच दोष- युक्त साथी आहे. व त्यास क्षमेचे वचन मिळाल्यावर त्यांनें हकीकत सांगितली. व तो असे ह्मणतो कीं, ही हकीकत मी कैदेस कंटाळल्यामुळे सांगितली. या कार णांवरून ज्या तीन कमिशनरांनीं एक ठिकाणी रिपोर्ट केला आहे त्यांनी ह्या पुराव्या विषयीं मोठ्या खबरदारीनें विचार केला आहे. व त्यांचे असे मत आहे की, मुद्या- च्या गोष्टींत ही हकीकत संभवनीय आहे. हिंदुस्थान सरकारास असे वाटते की, पुराव्यांत जे दोष आहेत त्यांजला अतिशय वजन देणे बरोबर आहे; व त्यांस दुसऱ्या पुराव्यावरून जेथे बळकटी येत आहे, त्या शिवाय इतर ठिकाणी ह्या पुरा- व्यांचा उपयोग करणे बरोबर नाहीं. परंतु जितक्या शंका घेववतील तितक्या पूर्णपणे घेऊन त्यांस असे आढळून येतें कीं, दामोदरपंत याणें सांगितलेल्या हकीकतींत व रावजी नरसू यांनी सांगितलेल्या हकीकतीत मुद्याच्या गोष्टीवर सांगितलेली हकी कत त्यांस माहीत नव्हती. व या शिवाय दोन स्पष्ट गोष्टींच्या संबंधानें दानोदरपं- ताच्या हकीकतीस हे बाहेरील भरंवशा लायक पुराव्यांवरून बळकटी येते. ३९. प्रथमतः निशाणी " झेड " चा कागद निःसंशय खरा आहे व त्यावरून असें दिसून येतें कीं, दामोदरपंत यास कांहीं कामाकरतां आक्टोबर ता० ४ सन १८७४ इसवी रोजी सोमलाची जरूर लागली व तो सोमल गायकवाडांकरतां पाहि जे आहे असें तो ह्मणाला. हा सोमल मिळाला नाहीं; कारण ह्या कामाकरतां गाय- कवाडांपासून लेखी हुकूम मिळवितां आला नाहीं अथवा निदान मिळाला तरी नाही. ह्या दस्तऐवजावरील आक्टोबर ता० ४ रोजचा शेरा गायकवाडांविरुद्ध केलेल्या फि... तुरांतील एक गोष्ट आहे असे समजणें असंभवनीय आहे. फिरून ह्या गोष्टाची कांहीं तरी खुलासा झाला पाहिजे व हा खुलासा " गायकवाडानें सोमल आणावया स सांगितलें होतें " ह्मणून जी दामोदरपंत यानें हकीकत सांगितली आहे याशिवाय इतर रीतीने झाला नाहीं. ४०. दुसरी गोष्ट अशी आहे की, जवाहिरखान्यांतील दरोगा नानाजी विठ्ठल हा साक्षीदार कर्नल फेयर यांच्याविरुद्ध केलेल्या फितुरांत नव्हता व तो असें ह्मणतो कीं, आक्टोबर ता० ३०च्या पूर्वी कांहीं हिरे पाहिजे होते व यांची जरूर कांहीं ने- हमींच्या कामाकरता लागली नव्हती, परंतु यांचें कांहीं औषध करावयाचें होतें व साबद्दल हिऱ्याची राख पाहिजे होती. अशी गोष्ट मजला पूर्वी माहित न व्हती असेंही तो साक्षीदार ह्मणतो. ह्यावेळेस कांहीं हिप्यांच्या खरेदीबद्दल जमाख- र्च छपवून ठेविण्याकरतां राजवाड्यांतील हिशेबांत फेरफार केला आहे व खोटे जमा- खर्च केले आहेत हें निशाणी "टी १ वरून सिद्ध होतें. व ही गोष्ट रामेश्वर मोराजी व नानाजी विठ्ठल व आत्माराम यांच्या हकीकतीवरून सिद्ध होते, फिरून