पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल याचा ठराव. (३०३) वंतराव यांस ह्याप्रमाणेच माहिती आहे. तर मग ज्या धन्याची आपण नौकरी केली त्यास व आपल्यास जी मोठी हितावह गोष्ट व ज्यांत सत्य आहे ती सांगण्याकरतां ह्या इसमांस कां बोलावलें नाहीं? याची कारणे त्यांच्या बारिस्टरांनी सांगितलेली आहेत ती अशी की, त्यांस " (गायकवाडांस ) हे दोन इसम दामोदरपंताबरोबर साथी आहेत किंवा नाहीत व ज्या पाहऱ्यांतून कोणतीही गोष्ट सुरक्षित यावयाची नाही त्यांतून हे सुरक्षित आले किंवा काय हे काहीं एक खात्रीनें सांगवत नाही; व त्यांचे मसलतदार ही गोष्ट खातरीने सांगण्यास असमर्थ आहेत." आतां जर पोलिसांनी फितुर केला आहे असे प्रदर्शित करणाऱ्या ज्या पुष्कळ सूचना आहेत त्यांपैकींच वर सांगितलेल्या दोन कारणांपैकी दुसरे कारण ही एक असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. गायकवाडांविरुद्ध केलेल्या बेतांत लष्करी लोकही सामील आहेत असे ह्मणणे कठीण आहे, परंतु ती कारणे जशी आहेत त शींच ठेवावीं. हिंदुस्थानसरकारास असें ह्मणण्यास काहींच हरकत दिसत नाहीं कीं, सालीम व यशवंतराव यांची साक्ष देऊन त्यांचेकडून खरी हकीकत सांगवि. ण्याचें व रावजी, नरसू व इतर लोक यांस गोंधळून टाकविण्याचे गायकवाड तर्फेच्या लोकांना नाकबूल केले ही गोष्ट त्यांच्यावर आलेले आरोप खरे व संभवनीय आहेत असे दाखविते. ३५ विष घालण्यास फूस देणे या संबंधाने अगदीं निराळ्या साक्षीदारांकडून शवजी व नरसू यांनी सांगितलेल्या हकीकतीस किती जोर येतो हैं आतां पाहिले पा हिजे. गायकवाडांची गुप्त रीतीने भेट घेणे, व त्यांजपासून पैसे मिळविणे ह्या संबंधा नें वर सांगितलेल्या प्रकारचा पुष्कळ जोर आला आहे हे स्मरणांत ठेविले पाहिजे. ८८ ३६ ह्यास अमीना अय्या इचे जवानीपासून बराच जोर येतो. ही अडाणी व भित्री आहे, परंतु हिच्या खरेपणाबद्दल मुळींच शंका घेतां येत नाहीं. आक्टोबर महिन्याच्या शेवटील दिवसांत हिची व गायकवाडांची जी शेवटची भेट झाली त्या वेळेस कर्नल फेर यांच्या जिवाविरुद्ध चाललेल्या मसलतींसंबंधी बोलणे निघालें. विषाचें नांव निघाले होते असे दिसत नाहीं. व साक्षीदारांस जादू " अथवा " कांहीं देणें " ह्यापासून विषाचाच बोध झाला किंवा नाही हें स्पष्ट नाहीं व ही गोष्ट मोठी मुद्याची नाहीं. कर्नल फेर यांजमध्ये मानसिक अधवा शारीरिक कांहीं फरक पडावा या हेतूने कांहीं शारीरिक प्रयत्न करणें आहे ही गोष्ट बोलण्यांत आली होती; व अमिना फार भ्याली; व तिनें कर्नल फेर यांचे विरुद्ध प्रयत्न करूं नयेत म्हणून गायकवाडांस सूचना दिली. कारण असे केल्यांत त्यांचा नाश झाला अ सता; आणि ती परत गेली तो फिरून आली नाहीं; इतक्या गोष्टी निश्चयानें शिळक राहतात. ३७ अमिनाच्या म्हणण्यास तिचा नवरा शेख अब्दुल्ला याजकडून बळकटी येते. हा असें ह्मणतो कीं, तिने त्यास दुसरे दिवशीं असे सांगितलें कीं, गायकवाड़ व साहेब यांचा मिलाफ होण्यांत कांहीं दिळे असतां बरें होईल किंवा कसे हा गा-