पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. उ० ---सरकार मला क्षमा देऊ किंवा न देऊं मीं खरें सांगितलें आहे. ते माझे मायबाप आहेत. प्र.... •---तुला क्षमा केली अशी कल्पना केली असतांना तूं हल्लीं मजकूर सांगतो आहेस त्यापेक्षां अधिक खरा मजकूर सागशील काय? उ० -- याशिवाय दुसरा कोणता खरा मजकूर नाही. सर्व मीं खरें सांगितलें आहे. सरकार माझे मायबाप आहेत. हवें असले तर त्याणी मला फाशी द्यावें. सर दिनकरराव--- ज्या मनुष्याशीं तूं गैरइमान केळेस त्या मनुष्याचा पसतीस वर्षे नौकर आहेस आतां भिऊं नकोस. जें मनांत असेल तें भिती न धरतां ईश्वरासमक्ष खरें सांग. उ० --- मला जें सांगणें आहे ते सर्व मीं खरें सांगितले आहे. मी ईश्वरासमक्ष खो- टें सांगितलें नाहीं." ३४ ( ९ ) गायकवाडांचे पक्षाकडील ह्या ममुष्यांनी सांगितलेल्या पुराव्याविरुद्ध काय ह्मणणें आहे तें आतां पाहिले पाहिजे. त्यांस सल्ला देणारे लोक, साक्षीदारानें सांगितलेल्या मजकुरांत असलेला फेरफार, त्याच्या स्मृतीचा दोष, असंभवनीय गोष्टी, व सरकार तर्फेच्या लोकांवर टीका इतक्या गोष्टी पसंत करतात; व जर गा- थकवाडांवर आलेले आरोप खोटे असतील तर समक्ष साक्ष देऊन ते खोटे पडतील असे जे मनुष्य त्यांस ते बोलावीत नाहींत. रावजी व नरसू यांनी सांगितलेल्या ह कीकतीप्रमाणे व तसेंच आयाचे हकीकती प्रमाणे व गुप्त भेटींसंबंधीं जे साक्षीदार आहेत त्यांच्या ह्मणण्याप्रमाणे यशवंतराव व सालीम हे प्रत्येक कामांत प्रत्येक प्रसंगी होते असे आहे. हे दोन इसम गायकवाडांचे भरंवशाचे नौकर आहेत. वर (कलम १७) यांत असें दर्शविले आहे कीं, या दोन इसमांस पुष्कळ पैसे मिळाले. यांस पकडल्यावर ते लष्करी पाहन्यांत होते, व पोलिसांचे ताब्यांत नव्हते. मुंबईतील आ डव्होकेट जनरल यांनी स्पष्टपणें असें सांगितले आहे कीं यांचा व पोलिसांचा काहीएक संबंध नव्हता, व महाराजांस कैद केलेल्या वेळेपासून महाराजांचे साळेि- सिटर बिन हरकत गुप्त रीतीने यांची भेट घेत असत; व ह्या त्यांच्या ह्मणण्यास कोणी विरोध आणला नाहीं. दुसऱ्या साक्षीदार लोकांप्रमाणे यांनी स्वत: काहीएक मजकूर सांगितला नाहीं व गायकवाड यांचा निरपराधीपणा शाबीत करण्यांत त्यांचें मोठें हित होतें. हिंदुस्थानसरकारचे कायद्यासंबंधीं मसलतदार लोकांस झालेल्या पुराव्यावरून असे वाटलें नाहीं कीं, ह्या इसमांची साक्ष घेतली असतां खऱ्या गो- ष्टीस कांहीं बळकटी येईल व असे त्यांस वाटण्यास कारण होते. परंतु गायकवाड यांची या स्थितीपेक्षां अगदींच भिन्न स्थिति होती. जरी दुसरे लोकांस खरी कोणती गोष्ट आहे हें झालेल्या पुराव्यावरून अनुमानानें कळेल तथापि त्यांस ते स्वतांच्या माहितीवरून ठाऊक होते. व त्यांस आणखी असेही माहीत आहे कीं, ती गोष्ट यशवंतराव व सालीम यांस ठाऊक आहे. त्यांच्या ह्मणण्याप्रमाणें खरी गोष्ट अशी आहे कीं, कर्नल फेर यांचे विरुद्ध राजवाड्यांत कांहीं कट नव्हता व सालीम यश: