पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०१) प्र० - तूं हा मजकूर खरा सांगतोस काय ? उ० - हेच खरे आहे. दरबारची अशी चाल नव्हती. कांहीं सरदार लोक व दिवाण साहेब बद देणग्या देत असत. प्र० - विष घालणें ही मोठी वाईट गोष्ट आहे. ही गोष्ट करण्यास जेव्हां महारा- जांनीं तुला फूस दिली त्यावेळेस तूं आपल्या बायका पोरांची काही तजवीज के - लीस काय? उ० - महाराजांच्या तोंडचे बोलण्यावर मी भरंवसा ठेविला. गवरनर जनरल यांचा ठराव. दिनकराव-विष घालणे ही मोठी भयंकर गोष्ट आहे. आणि कोणी मनुष्य तिज- विषयीं दहा मनुष्यासमक्ष बोलेल काय? उ ० – त्यावेळेस तेथें दहा मनुष्ये नव्हती. दोन महाराजांचे नौकर व दोन आह्मी प्र० -जें विष दिले तें थोडे किंवा फार होते आणि तें तीन वेळ दिलें का? उ० - मीं आपल्या सर्व आयुष्यांत कधी कोणास विष दिले नाहीं. तें विष रावजी- जवळ दे म्हणून मला सांगितलें. प्र० - फैजुवर ह्याबद्दल आरोप आणावा ह्मणून तुला कोणत्या नौकरांनी सांगितलें उ० - मला कोणीही तसे करण्यास सांगितले नाहीं. प्रत्येक जणांनी आपल्या ज- बानीत त्याचें नांव सांगितले आहे. ह्मणून मीही त्याचेच नांव सांगितलें. - त्याचे नांव कोणी कोणी सांगितले आहे? उ०- अब्दुल्ला, पेट्रो, रणछोड, हमाल, एकंदर पांच सहा असामींनी त्याचें नांव सांगितले आहे. प्र० प्र० - पहिल्या भेटीस महाराजांनी तुला लुच्या ह्मणोन शिवी दिली; व असे भ- थंकर काम नंतर त्यांनीं तुजकडे कसे सोपविलें. उ० - रावजी, यशवंतराव, सालीम हे मजला घेऊन गेले होते. त्यांनी मजबद्दल खाली दिली. प्र०. ० -- तूं हिंदू आहेस काय ? उ० - होय. प्र० - तुझी जात कोण? उ० - मी तेलंगी कामाठी आहे. प्र० - पोलिसाची भीति वाटती काय? उ० - काय कारण ? प्र० - खरें सांगण्याकरितां. ल०. खरे सांगण्यांत कसली भीति आहे. प्र० --- तूं दोषी आहेस असे तुला वाटते काय ? उ० -तें माझे वाईट नशीब. मी त्या खटल्यांत होतो. म० - जर तुला क्षमा केली तर तूं ईश्वरासमक्ष खरें सांगशील काय?