पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. मनाचा विशेष झोंक काय तो तशाच प्रकारच्या कृत्यांकडे असे. एकंदरीने सर्व प्रजेचें हित कोणत्या उपायाने होईल हे जाणणाऱ्या पुरुषाची दिवाणगिरीच्या कामावर योजना केली असती तर त्यानें सांप्रतच्या देशकालानुरूप राज्याचा बंदोबस्त करून मल्हारराव महाराज यांचे राज्य चिरस्थायी केले असते. मल्हारराव महाराज याणी दिवाणगिरीच्या कामावर योग्य मनुष्याची योजना केली नाही, आणि राव साहेब यांजवर देखोल सर्व राज्यकारभार टाकून आपण त्यांच्या तंत्राने वागले नाहीत यामुळे राज्यांत विशेष घोटाळा झाला. राव साहेब यांजमध्ये राजकीय ज्ञानाची जरी उणीव होती, व त्यांचे सकुमार शरीर आधी व्याधी आणि जरा यामुळे परिश्रमक्षम नव्हतें, तरी महाराज यानी सर्व भार त्यांजवरच लोटला असता तर त्यान चांगले हुषार कामदार आपल्या हाताखाली घेऊन कांहीं तरी नीट व्यवस्था केली असती. कर्नल बार साहेब यानी बडोद्याच्या राज्याबद्दल केलेल्या रिपोर्टावर मुंबई सरकारानी ठराव केला त्यांत देखील लिहिले आहे की:- 66 गोपाळराव मैराळ हे मोठे अब्रूदार असून बडोद्यांतील सर्व लोक त्यांस वाखाणतात, सबब प्रधान पदावरील त्यांच्या नेमणुकीविषयों कोणी अडथळा घेतला नाहीं; परंतु त्यांच्या वृद्धावस्थेमुळे आणि ते राज्यकारभार चालविण्यास अननुभविक असल्यामुळे येवढ्या जबरदस्त जोखमेच्या कामाचे ओझे त्यांच्यानें निभावले जाईल किंवा कसे याचा संशय आहे, सबब कौन्सिलांत नामदार गवरनर साहेब यानी बडोदें संस्थानचे हित मनांत आणून त्या दरबारास उपदेश केला आहे की, जर साधेल तर एक हुषार व विद्वान, ज्याला वर्तमानकाळी राज्यकारभाराची व्यवस्था कशी राखावी याचे अनुभवशीर ज्ञान असेल असा एक तरुण मनुष्य प्रधानाला मदतनीस करावा. 99 मुंबई सरकारच्या सूचनेप्रमाणे राव साहेब यांच्या हाताखाली मुंबई हायकोर्टाचे डेप्युटी रजिस्ट्रार खंडेराव चिमणराव बेदरकर यांची योजना करण्याविषयी मल्हारराव महाराज यानीं धारले होते, परंतु कर्नल बार साहेब यांचे रिपोर्टावरून असे दिसतें कीं, खंडेराव यानी महाराजांची नौकरी पत्करिली नाहीं, आणि त्याचे कारण कर्नल बार यानी तारीख ८ माहे एप्रिल सन १८७२ च्या रिपोर्टात खाली लिहिल्याप्रमाणे लिहिले आहे. “ सदरील माझे सलेवरून एक नेटिव चांगले चालीचा, हुषार मनुष्य असिस्टंट मिनिस्टर नेमण्याविषयीं महाराजानी कबूल केले, परंतु आलेल्या गृहस्थास असें लवकरच समजलें कीं, माझ्या खऱ्या समजुतीस सत्यवादीपणाच्या चालीप्र- माणें येथें बनू शकेल असे नसून, फक्त आपली मोठी नेमणूक घेऊन, जसें होत असेल तसे पाहून त्यांचे इच्छेनुरूप राहावे लागेल, असे त्या सभ्य नेटिव गृहस्थाने पाहून त्यानें मोळ्या नेमणुकीचा अव्हेर करून मोठा स्तुत्य निर्लोभीपणा दाखविला. " *

मी हा उतारा एका मराठी भाषांतराषरून घेतला आहे.