पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३००) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास नामांकित नौकर आहेत. जरी गजानन विठ्ठल यांची कास एग्झामिनेशन करते वेळी मि० बालंटाईन यांस अशी सूचना होती की, त्यांचे अब्रूस बट्टा आणणारा कांहीं मजकूर बाहेर काढावा तथापि तसें मि० बालंटाईन यांचे हातून कांहींएक झालें नाहीं. सर लुईस पेली यांचे हुकुमावरून हे सर्व इसम काम करीत होते; व पेली साहेबां चे नजरेस कोणत्याही प्रकारचा अन्याय आला असता तर त्याची त्यांनी तत्क्षणींच कडक रीतीनें तजवीज केली असती. नरसू हा कैद केल्यापासून पोलिसांचे ताब्यांत नव्हता, परंतु लष्करी पाहायांत होता. आतां ह्याच्याशी पोलिसाचा अशा रीतीनें संबंध होता कीं, उत्तम रीतीने त्यास बनावट हकीकत रचतां आली असती, व ती हकीकत कमिशन समोर सांगण्याकरितां त्यास पढवितां आलें असतें, ही गोष्ट शाबीत करण्यास कोणत्याही प्रकारचा पुरावा नाहीं. आणखी अशी गोष्ट आहे कीं, ज्या आंतील पुराव्यावरून रावजी व नरसू यांनी मिलाफ केला ही गोष्ट खोटी ठरते, तोच पुरावा पोलिसांनी हा खटला बजावला ही गोष्ट खोटी करितो. अशी स्थिति असल्यामुळे हिंदुस्थान सरकारास असे वाटते की, रावजी व नरसू यांनी सांगितलेली हकीकत पोलिसांनी बनावट केली नाहीं. ह्या विषयावर मुंबईतील आडव्होकेट जनरल जे बोललें त्यांस हिंदुस्थान सरकारचें पूर्ण अनुमत आहे असे प्रगट करण्याची त्यांची इच्छा आहे. आणखी त्यांस असे वाटते की कांहीं पुरावा नसतां मि० बालंटाईन यांनी पोलिसांवर हल्ला करण्यांत जो भरंवसा दाखविला तो त्यांचे तर्फे खटला अगदीं कमजोर आहे असे दाखविण्यास एक पुरावा आहे. ३३ (८) ह्या साक्षीदारांची जबानी देण्याची रीत त्यांचे विरुद्ध आहे असे गायक- वाड यांचा बारिस्टर सुद्धां ह्मणत नाहीं असे हिंदुस्थान सरकारचे लक्षांत आले आहे. व ज्या तीन कमिशनरांनीं एके ठिकाणीं रिपोर्ट केला आहे, ते असे ह्मणतात की, नरसूची रीत फार चांगली होती. सर दिनकराव यांचा व नरसूचा धर्म एकच आ है. व त्यांचे त्याजवर वजन बसण्यासारखें होतें; व त्यांणीं त्यांस फारच कसून वि चारले तथापि याचा परिणाम इतकाच झाला कीं, तो मनुष्य खरा आहे असे उत्तम रीतीनें दिसून आलें. हिंदुस्थान सरकार या संबंधानें प्रश्नोनरें जीं झालीत खालीं लिहीत आहेत. त्याजवरून असे दिसून येईल कीं, जरी साक्षीदारास पुष्क- ळ कसून विचारलें तथापि त्याने एकच गोष्ट खरी आहे म्हणून सांगितलें. व ती खरी गोष्ट त्याने कमिशन समोर सांगितली आहे. “सर दिनकररात्र-तूं चौतीस वर्षे नौकर आहेस. पहिले कमिशन भरल्यापासून तूं महाराजांकडे जात असस किंवा त्याचें पूर्वी उ० - पहिले कमिशन भरल्यापासून त्याचे पूर्वी नाही. मी साहेबांबरोबर खंडेराव महाराजांकडे गेलो आहे. त्याशिवाय इतर वेळी गेलों नाहीं- दिनकरराव - दसप्याबद्दल देणगी मागण्यास तूं खंडेरावाकडे कधी गेलां होतास काय? उ० - नाहीं,