पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. ( २९९ ) आणले तेव्हां रावजीनें त्यास फक्त इतकेंच सांगितले की, मीं गळ्यापर्यंत सर्व खरी हकीकत सांगितली आहे. ३१ (७) परंतु असे कोणी ह्मणेल की, जी हकीकत रावजी व नरसू यांणी सांगि तली ती कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शिकवणीवरून सांगितली असावी म्हणजे ह सर्व पुरावा पोलिसाने बनविला आहे. खरोखर गायकवाडतर्फे जें बारिस्टरानें भाषण केले त्यांत अशाच प्रकारच्या कल्पना फार प्रमुख आहेत. गायकवाडांच्या बारिस्ट- रानें मि० सूटर साहेबांपासून एकसारखा सर्व पोलिसांस दोष दिला आहे व असेही म्हटले आहे की, यांणीं साक्षीदारांस मारहाण केली व पुराव्यांत ज्या पंचाइती उप्त- न्न होत यांतून आपली सुटका करून घेण्याकरतां ते नेहमी हा पुरावा पोलिसांपासून उप्तन्न झाला आहे असे प्रतिपादन करीत. हे म्हणणे खरे व्हावे म्हणून त्यांच्याकडून जो पुरावा बाहेर निघाला तो हेमचन्दापासून निघाला. हा हेमचन्द हियाच्या खरी- दीबद्दल साक्ष देण्यास आणिला होता व ही गोष्ट सर्व खटल्यांत हलक्या प्रतीची आहे. ज्या साक्षीदारांस कैदेत ठेवेले नव्हते त्यांपैकी हा एक साक्षीदार, व याणें काम- शनपुढें जी साक्ष दिली आहे त्या साक्षीचा व पोलिसांपुढे प्रथमतः झालेल्या जबानी- चा विरोध आहे. हा विरोध बरोबर आहे असे दाखविण्याकरितां तो असें ह्मणाला की, गजानन विठ्ठल याणे माझी पहिली जबानी जुलमानें घेतली व त्याणें मजकडून वह्यांत खोटा जमाखर्च करविला. ज्या तीन कमिशनरांनी एकच रिपोर्ट केला आहे ते ह्या हेमचंदाचे संबंधानें असें ह्मणतात कीं, साधारणत: त्यांच्या साक्षीवर भरंवसा ठेवितां येत नाहीं व त्याचे बोलण्यांत जबरदस्त विरोध आहे. त्याची कमिशनपुढे सा क्ष होत असतां त्याणे आपली सही नाकबूल केली. व आपल्यास हिंदुस्थानी येत नाही किंवा अशी एकादी भाषा असल्याची सुद्धां माहीत नाही, असे त्याणे खोटें सांगितले. मजवर जुलूम झाला असें तो सांगतो तें तीन कमिशनर खोटें मानतात व हाच अभिप्राय हिंदुस्थान सरकारचा आहे. त्याची पूर्वीची जबानी गजानन विठ्ठलाने घेतली नाहीं, परंतु मि० सूटर यांणी घेतली व दोन दिवसांनंतर सर हुई पेली यांच्यासमक्ष हेमचंदानें तीवर सही केली; व जरी त्यास असें माहीत होते कीं, निदान सर लुई पेली हें कमिशनरांप्रमाणें आपणास गजानन विठ्ठलच्या वासापासून एका क्षणांत मोकळे करतील तथापि ह्या दोन्ही गृहस्थांसमोर त्याणे कांहीं एक तक्रार केली नाहीं. ही गोष्ट व ह्या साक्षीदाराचा खो- टसाळपणा व खटल्याच्या प्रत्येक भागापासून आपणास अलग ठेवण्याची इच्छा ह्या सर्व गोष्टी त्याचा सर्व पुरावा एकीकडे ठेवण्यास हिंदुस्थान सरकारास भाग पाडतात. ३२ परंतु हेमचंद याची जबानी एकीकडे ठेविली ह्मणजे रावजी व नरसू यांनी सांगितलेल्या हकीकतीतील कांहीं भाग पोलिसांनी बनावट केला अथवा त्यांनी सा क्षिदारांस शिकविलें या ह्मणण्यास जोर आणणारा पुरावा मुळींच राहत नाही. त्यांनीं अशी हकीकत बनावट करावी हे स्वल्प रीतीनें समजत नाहीं. कारण अशा रीतीने वर्तन केले असतां हिंदुस्थान सरकार खुष होईल असे त्यांस खचीत कधींही वाटणार नाहीं. मि० सूटर, अकबर अल्ली, अब्दुलअल्ली व गजानन विठ्ठल हे सर्व मुंबई सरकारचे ३५