पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. हकीकत त्यानें सांगितली नसती; तर त्यानें अशी हकीकत सांगितली असती की, जी खोटी पडण्याचा संभव अतिशक्ति थोडा ह्मणजे ज्यांत दुसरे लोक किंवा कांहीं ठळक गोष्टी मुळींच येणार नाहींत, व जी आपल्या तर्फे पुरावा देण्या- चें सामर्थ्य नाहीं अशा लोकांसच लागूं पडेल. नरसूच्या संबं. धानें तर त्यानें आपला जीव धोक्यांत घालून ती हकीकत सांगितली. तुनला माफी मिळणार नाही असे सास स्पष्ट रीतीने सांगितले होतें. ह्यास्तव उगीच बसणें, अथवा अशा रीतीनें हकीकत सांगणे की गुन्हा करण्याचे कामांत आपण प्रमुख नव्हतों असें दिसेल, हेंच व्यास हितावह होतें. ह्या सर्व संबंधानें निर्णय इतकाच होतो की, नर साक्षीदार खोटे बोलले आहेत तर जिकडून त्यांचा फायदा होणार नाहीं तो त्यांनीं म- नकूर सांगितला आहे व एकानें तर आपल्या हिताचे विरुद्ध सर्व हकीकत सांगित- ली आहे. २९ कर्नल फेर यांचे मनांत गायकवाडांविषयों फार वाईट कल्पना होती है रे. सिडेंसोंतील नौकर माणसांस ठाऊक होतें, व ह्याजमुळे नरसू व रावजी यांस असे बाटले की, आपण जर गायकवाडांचें नांव घेतले तर फेर साहेबांस बरें वाटेल, असे ही कदाचित ह्मणणें असेल, परंतु ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, जेथपर्यंत कर्नल फेर साहेब बडोद्याचे रेसिडेंट होते व ज्या वेळेस त्यांनी पहिली चौकशी केली. तेथपर्यंत गायकवाड यांजवर मुळींच आरोप भाला नव्हता. कर्नल फेर यसि बडो- द्यांतील रेसिडेंटाचे कामावरून दूर केल्यानंतर रावजी व नरसू यांनी गायकवाडांस अनुलक्षून गुन्ह्याच्या संबंधाने आपली हकीकत सांगितली व त्या वेळेस कर्नल फेर ह्यांजपासून आपलें कांहीं हित होईल असे वाटण्याचा मुळींच संभव नव्हता. हो व इतर गोष्टी यांवरून असे दिसतें कीं, यांनीं जो गुन्हा कबूल केला तो कांहीं बेत करून केला नाही, परंतु असे करण्याचे कारण येवढेंच कों, आतां चौकशी नीट रीतीनें मार्गास लागली आहे. व आतां आपण होऊन कबूल करावें हेंच बरें. . ३० [६] ह्या पुराव्यांत कांहीं मिलाफ होता असें ह्मणणे आंतील व बाहेरील पु. राव्यावरून खोटे ठरतें. जर शवजी व नरसू यांनीं बेत करून खोटी गोष्ट सां- गितली तर हें उत्तम प्रकारच्या चातुर्ययुक्त उलट तपासणीमध्यें बाहेर पडले नसते अशी कल्पना करणे फारच कठीण आहे. उलट असे झाले असतें कीं, मुद्याच्या गोष्टीवर त्यांचा एकमेकांशी असा विरोध पडला असतो की, त्यांची एकवाक्यता करतां आलीच नसती, अथवा प्रत्येक बारीक गोष्टींत त्यांचा इतका मिलाफ असता कीं, निरनिराळ्या मनुष्यानें स्वतंत्र रोतीनें गोष्ट सांगितली असता जो फरक पडावया चाच. परंतु हिंदुस्थान सरकारानें त्याच्या हकीकतींतील सारखेपणा व विरुद्धपणा ह्या संबंधाने आपले मत वर सांगितले आहे. आतां बाहेरील पुराव्याच्या संबंधानें असें खास रीतीनें निष्पन्न झालें आहे कौं, रावजीस ता० २२ डिसेंबर रोजी कैद केल्या. पासून नरसूपासून अगदी निराळा ठेविळा होता व एकमेकांनी काय हकीकत सांगि तली हैं एकमेकांस कळं दिलें नाहीं. व जेव्हां ता० २३ रोजी नरसूस रावजीसमोर