पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गव्हरनर जनरल यांचा ठराव. ( २९७ ) एक पुडी व पांढरा दोरा सांपडला. नंतर साणे मि० सूटर साहेबांस शेजारच्या खो- लांतून लागळेच बोलावले व त्याणे तो पुडी बाहेर काढली व उघडली. त्या पुडींत पांढरी भुकटी होती व तिचें मुळतत्व विवेचन झाल्यावर ते विष आहे म्हणून ठरले. डाक्तर प्रे असे म्हणतात की, पांढऱ्या सोमलांत पुष्कळ जातीभेद आहेत, परंतु राव- नीच्या पट्टयांत जो सोमल सांपडला त्याच्या परीक्षेवरून असे समजतें कीं, कर्नल फेर साहेबांच्या सरबतांत जो सोमल सांपडला तो व हा एकाच जातीचा आहे. २६ आतां ह्या वेळपर्यंत आपल्या जवळ काही भुकटी आहे असे रावजीनें को- णास सांगितले नव्हते. त्याने दिलेल्या जबानींत दोन भुकव्या मिळाल्या होत्या एव्ह ढेंच मात्र सांगितलें होतें. दुसरे वेळेस ह्यास एकच पुडी मिळाली व त्या पुडीतील सर्व पदार्थ त्याणे ता० ९ नोवेंबर रोजी कर्नल फेर यांच्या सरबतांत घातला. पाहे- ल्या वेळेस त्यास दोन पुड्या मिळाल्या होत्या व त्या त्याणें एकत्र करून दोन तीन दिवस सरबतांत घातल्या. जेव्हां ती पुढी त्यांचे पट्ट्यात सापडली त्या वेळेस एक भुकटी आपण सारी दिली नव्हती है त्यांस स्मरण झाले व हा मुद्दा त्याणे खुला सा करून सांगितला. • २७ ह्या एकमेकांशी जुळणारे पुराव्याविरुद्ध एकाच गोष्टीची सूचना आहे. तो गोष्ट अशी की, ही सर्व पोलिसांनी बनाऊ गोष्ट रचली आहे. व हें शाबीत कर- व्याचा प्रयत्न गायकवाड यांच्या बारिस्टरांनी केला, परंतु त्यांच्या वतीनें कांहीं एक पुरावा पुढे आला नाहीं. व हो कल्पना जरी अगदी असंभवनीय नाहीं, तथापि खरी मानण्यास फारच कठीण आहे. रावजी मीं सर्व विष दिले अर्से सांगत असतां पोलि. सांनीं कांहीं राहिलेलें विष पुढे आणण्याचा विचार का करावा. व सोमल व हिया- ची भुकटी दिली असता त्यांनी पट्टयांत, नुसता सोमल कां ठेवावा. व कर्नल फेर यांस ज्या जातीचा सोमल दिला होता तो जात यांस कशी कळावी. डिसेंबर पासून विष सांपडण्याचें वेळेपर्यंत जो पट्टा सदोदीत बुधर याचे क होता त्या पट्टयांत गुप्त रीतीने ह्याचे हातून विष कसे ठेवले जावें. ह्या सर्व अडचणी व भाणखी दुसऱ्या कांहीं शंका यांचे निवारण केल्यावांचून पोलिसाने बनावट खट- ला केला असे झणण्यास आधार मिळत नाहीं. व ता० १५ २८ (५) ह्या साक्षीदारांनी जी हकीकत सांगितली आहे ती सांगण्यांत यांचा कांहीं नफा आहे काय ? कोणीही असे सुचविलें नाहीं कीं, ह्यांचा व गायकवाड यांचा द्वेष होता अथवा गायकवाडांचा पाडाव झाल्याने त्यांचें कांहीं हित झाले अ सतें. कांहीं हकीकत सांगण्यांत रावजीचा नफा होता हे खरे आहे, कारण जर तो खरी हकीकत सांगेल तर व्यास गुन्ह्याची माफी मिळणार होती. तर मग माफी मि. ळविण्यानें त्याचा नफा होता, व ती मिळावी ह्मणून खरी गोष्ट त्यास सांगणे जरूर होतें; अथवा जर त्यास खोटी हकीकत सांगावयाची असती तर ज्यांच्याकडून त्याचे म्हण णे खोटे पडेल असे लोक ज्या हकीकतत येतील किंवा ज्या मनुष्यांस खोटें उघड करून दाखविण्याचे मार्ग पुष्कळ आहेत अशीं मनुष्ये त्या हकीकतीत येतील अशी