पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ला असता. तारखांच्या संबंधाने त्यांमध्ये फेरफार आहे, परंतु ह्याविषयीं पुर्वीच लिहिले आहे. गायकवाड याशी झालेल्या भेटींच्या संख्येत फेरफार आहे. भेटींच्या वेळेस काय बोलणी झालीं व काय शब्दांचा उपयोग झाला. व कोणी काय केलें ह्याविषयीही त्यांच्या सांगण्यांत फरक आहे. तीन कमिशनरांनी एके ठिकाण के- लेल्या रिपोटीत रावजी व नरसू ह्यांजमध्ये असलेल्या तफावतीबद्दल कलम ३४। ४२ यांत सागितलेले मत हिंदुस्थान सरकारास पुर्णपणे पसंत आहे. व त्यांस असे वाटते कीं, ह्यावरून त्या गोष्टी खोच्या आहेत असे न ठरतां उलटें या गोष्टींवरून त्या साक्षिदारांनी मिलाफ केला नाहीं व त्यांस कोणी शिकविलें नाहीं भर्से शाबीत होतें. २४ (४) पुनः हिंदुस्थान सरकारास असे वाटते की, एकपक्षी ह्यांणी सांगितले- ल्या हकीकतींत व दुसऱ्या पुराव्यांत व बाहेरील गोष्टींत समेट आहे व हा समेट नर ती हकीकत खोटी असती तर कधीं झाला मतता. ज्या खोलीत व उया गाड्यांत आह्मांस नेलें असे हे साक्षीदार ह्मणतात त्यां वाड्याच्या व खोलीच्या संबधाने ह्यांचे झणणे एकमेकांशी जुळते. रावजीस ५०० रुपये मिळाले ही गोष्ट निःसंशय घडली असा पुरावा झाला आहे. त्याचे साथी जगा व काभा- ई यांची रावजीचे राजवाड्यांत जाण्याच्या संबंधानें एकसारखीच हकीकत आहे. रावजी व नरसू यांणी राजवाड्यांत बातमी पोहोचविली ह्या संबंधानें जगाचें ह्मणणे व कोडतासमोर आलेले पत्र ह्या दोन गोष्टी एकमेकांशी जुळतात. ५०० रु० देते बेळेस ज्या गोष्टी घडल्या ह्मणून रावजी सांगतो त्या गोष्टींशी जगा व दलपत यांणीं सांगितलेली हकीकत जुळते. रावजीनें जो उधळेपणाचा खर्च केळा तो व त्यास कोणा एका ठिकाणाहून पुष्कळ रकमा मिळाल्या हे एकमेकांशी जुळते व खरोखर मुख्यत्वेंकरून ह्याच गोष्टीमुळे रावजीबद्दल लोकांत संशय आाछा व त्यास केंद केलें. २५ (५) बाहेरील पुराव्यांत एक गोष्ट इतकी ध्यानांत ठेवण्याजोगी आहे की, ती खुलासेवार सागितली पाहिजे. नोवेंबर ता०९ रोजी जेव्हां कर्नल फेर साहेबांच्या सर्व नौकर माणसांच्या जबान्या घेतल्या त्या वेळेस रावजीचा पट्टा परत घेऊन एका खोलीत खुंटीस टांगून ठेविला. दिसेंबर ता० १५ रोजी बुधर नांवच्या शिपायास हा पट्टा दिला व त्या वेळेस रावजी काय हकीकत सांगणार आहे किंवा तो निदान कांहीं तरी बोलणार आहे हे कोणास माहित नव्हते. त्यास दिसंबर ता०२२रोजी पकडले व त्याणें आपली जबानी ता० २४/२५ रोजी दिली. यानंतर अक्कबरअल्ली मुंबईतील डिटे- क्टिव्ह पोलिसांचे मुख्य यांस असे सुचले की, ज्या भुकटीविषयी रावजीनें हकीकत सांगितली तिचा कांही पत्ता लागेल व त्यावर रावजीस त्या पुड्या कोठें ठेवीत हो- तास म्हणून प्रश्न केला. मी त्या पुड्या पश्चांत ठेवीत असे म्हणून मानें सांगितले. नंतर बुधरास बोलावून आणले व त्याचें अंगावर तो पट्टा त्या वेळेस होता. हा पट्टा त्याचे ताब्यांत ता० १५ पासून होता. बुधरानें तो पट्टा अक्कवरअल्लीचे स्वाधीन केला व रावजीने पुड्या ठेविण्याची जागा दाखविली. अकबर अल्लीने शोध केला व मांस