पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल याचा ठराव. (२९५) विचारील. कोणाचाही कट करते वेळेस जी गोष्ट विचाराअंती अधिक शहाणपणाची दिसते ती सोडून देऊन अमुकच गोष्ट का केली असा प्रश्न कोणी विचारल्यास उत्तर देणे कठीण असते. परंतु या खटल्यांत हे उत्तर सहज देतां येईल. रावजी है। कापत रहात होता व नरसू हा गावात होता. [२] राजवाड्याशीं व्यवहार ठेवण्यास नरसू अधिक सोईवार होता, हे ह्या कार. णावरून स्पष्ट होते. परंतु ह्यापेक्षा अधिक महत्वाची अशी एक गोष्ट आहे कीं, नरसू हा रावजीचा वरिष्ठ अधिकारी होता व तो कर्नल फेयर यांजपार्शी पडवीत ने- हमी हजर असे. ह्या कारणांवरून असे स्पष्ट होते की, जर नरसू जमादार साथी झाला नसता तर ह्या कामांत अपेश येण्याचा किंवा सांपडण्याचा रावजीस फार मो. ठा धोका होता. S २२ [२] ह्या हकीकती एकमेकांशी तोलून पाहिल्यानंतर त्यांत कांही महत्वाचा विरोध आहे असे हिंदुस्थान सरकारास वाटत नाही. या साक्षीदारांनी पूर्वी दिलेल्या जवानीत व मागाहून सांगितलेल्या हकीकतींत बराच वेळ गेला होता. उत्तम हुशार अशा वकिलानें ह्या साक्षीदारांची विरुद्ध पक्षाकडून जबानीही घेतली व ह्या वेळेस कोणत्याही मुद्याच्या गोष्टीवर त्या साक्षीदारांच्या हकीकतीत विरोध उत्पन्न झाला नाहीं. त्यांस तारखांचे बरोबर स्मरण नाहीं; परंतु ज्या मनुष्यास ह्या देशांतील लोकांशीं व विशेषतः अशिक्षित लोकांशी व्यवहार घडतो व्यास असें पक्केपर्णी माहीत आहे की अशा गोष्टीत त्याच्यापासून अचूकपणा कधींही होणार नाहीं व अशा फरकावरून सर्व पुरावा भरवशालायक नाहीं असे झटले असतां सर्व देशभर न्याय मुळींच मिळणार नाहीं. रावजी आपल्या वर्तणुकीत धरसोड दाखवितो, परंतु जे लोक एकदां वाईट गुन्हा करण्यास आपणास प्रवृत्त करीत असतात त्यांच्या वर्त- णुकीशी ही धरसोड विरोधी नाहीं. त्याणे सांगितलेल्या हकीकतीतही काही भाग न समजण्याजोगे आहेत, उदाहरणार्थ जी शिसी गायकवाड यांणी दिली असें तो ह्मणतो त्याबद्दल; परंतु ही गोष्ट त्यागें प्रथमतः दिलेल्या जबानींत सांगितली नव्हती. प्रत्येक साक्षीदाराने सांगितलेली हकीकत मुद्दाचे गोष्टीवर कायम आहे. गुप्त रीतीने झालेल्या भेटी, त्या वेळेस हजर असणारे लोक, पैसा घेणें, कर्नल फेयर यांस विष देण्याबद्दल गायकवाडांनीं केलेली विनंती, गायकवाडांकडून रावजीकडे विष जाणें, व नोवेंबर ता० ९ रोनी कर्नल फेयर साहेबांच्या सरबतांत विष घालणें ह्या सर्व गोष्टी ज्या रीतीने पूर्वी सांगितल्या होत्या त्याच रीतीने पुढेही सांगितल्या गेल्या. ज्या तीन कमिशनर लोकांनी निरनिराळी मतें दिली आहेत त्यांणी या दोन साक्षीदारांनी सां. गितलेल्या हकीकतीत कांहीं विरुद्ध आहे असे सांगितल्याचे हिंदुस्थान सरकारचे लक्षांत येत नाही. २३ [३] मुद्याच्या गोष्टीवर ह्या दोन साक्षीदारांची हकीकत एकमेकांशी जुळते हेंदी आणखी निश्चित आहे. किरकोळ गोष्टींत कांहीं फरक आहे व हा फरक जर पडला नसता तर याणी मिलाफ केला असा त्यांच्यावर योग्य रीतीनें संशय आ