पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. नाहीं तर सर्वांच्या रोतीस व साधारण ज्ञानास असें करणें विरोधी होईल. वयापासून वारंवार खऱ्या गोष्टीचा शोध लागण्याचे कामांत अडथळे येतील. अशा वेळेस इतकें- च करणे अगस आहे कीं, नेहमीं अशा पुराव्याच्या खरेपणाबद्दल जी कसोटी छा- वण्याचा प्रघात आहे ती कसोटी ह्या पुराव्यास लावून पाहवी व हा पुरावा ज्यांचा संशय नाही अशा लोकांपासून आला असता तर जितका कडकपणा घरला असता त्यापेक्षां अधिक कडकपणाने हा पुरावा वरील कसोटीस लागतो कीं नाहीं हे पहावें. २० ह्या सर्व खटल्यांत असे नेहमी लक्षांत बाळगले पाहिजे कीं, कांहीं गोष्टी पुराव्यावरून सिद्ध झाल्या आहेत, परंतु ह्यांस उपपत्तीची जरूर आहे. एकाच माण- सानें केलेल्या गोष्टींच्या मालिकेत एका बाजूस गुप्त रीतीनें चालवलेली लबाडी आहे व दुसरे बाजूस त्या कृत्यांचा परिणाम आहे. ह्या वेळेस या दोहोंचा संबंध आहे व तो संबंध नीट रीतीनें उघड झाला पाहिजे असेच अनुमान करणे योग्य आहे. तर हिं दुस्थान सरकार खाली लिहिलेले सवाल विचारतात. १ साक्षीदारांनी सांगितलेला खुलासा स्वतः भरंवशालायक आहे किंवा कसे ? ते ज्या हकीकती सांगतात त्यांचा परस्परांशी मेळ आहे किंवा कसे ? ३ त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मुख्य मुख्य ठिकाणी एकमेकांशी मिळतात किंवा कसें ? ४ जेव्हां हे साक्षीदार बाहेरील गोष्टी सांगतात व ज्याशी त्यांची तुलना करतां येईल त्या गोष्टींशी त्यांनी सांगितलेली हकीकत जुळते की काय, आणि स्वतंत्र साक्षी दारांनी सांगितलेली हकीकत व इतर गोष्टी मुख्य मुख्यांत एकमेकांशी जुळतात किंवा कसें ? ५ साक्षीदारांनी जी हकीकत सांगितली आहे ती सांगण्यांत त्यांचें कांहीं हित आहे किंवा कसें ? ६ त्यांनी एकमेकांशीं मिलाफ केला आहे हे संभवनीय आहे किंवा कसे ? ७ एखाद्या सर्व साधारण अधिकाऱ्यानें ह्या साक्षीदारांस शिकविले आहे हें संभव- निय आहे किंवा कसें? ८ जबान्या चालल्या असतां साक्षीदारांची बर्तणूक अशी होती की, त्यापासून त्यांचें ह्मणणे खरें आहे असे मनास वाटावे किंवा ह्याचे विरूद्ध त्यांची वर्तणूक होती! ९ व्यांच्या पुराव्यावरून जो मनुष्य दोषाविष्ट होतो त्या मनुष्याने त्या पुराव्या- विरुद्ध घोटपणानें व खात्रीने दुसरा पुरावा दिला किंवा कसें? २१ (१) ह्या दोन साक्षीदारांनी सांगितलेल्या हकीकतींत एकही गोष्ट असंभव- नीय किंवा भरंवशास नालायक अशी नाहीं व वर सांगितलेले दोन मुख्य मुद्दे शाबी- त ठरल्यानंतर व्यांणी सांगितलेल्या हकीकतींत एकही गोष्ट इतकी असंभवनीय नाहीं कीं, ती साधारण विचारयुक्त पुराव्यांनी शाबीत होणार नाहीं, रावजीनें हें काम पतकरल्यावर नरसूसही तें काम सांगावें व अशा रीतीनें आणखी एक साथी घेऊन भीतीची कारणे वाढवावीं असें गायकवाडांनीं का करावें? असाही प्रश्न कोणी