पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गरवनर जनरल यांचा ठराव. (२९३ ) मद्दल ह्या रकमा खर्ची पडल्या आहेत असा त्यांचा मतलब आहे. परंतु वास्तविक रीतीनें पहातां या रकमांचा खर्च खोटा आहे व अशा प्रकारचा माल सदर इसमांक- डून पोहोंचला नाहीं. आतां सालम व यशवंतराव हे गायकवाडांचे विश्वासूक अंत स्थ काम करणारे इसम आहेत व रेसिडेसातील नोकर माणसांस ने सर्व पैसे मिळाले ते यांचे मार्फत मिळाले. तर ज्या पैशांतून कोणच्याही प्रकारचें गुप्त काम झाले त्या- बद्दल पैसे देण्यास ही रकम होती. गायकवाड यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी ( खाजगी कडील शिरस्तेदार ) दामोदरपंत हा असें ह्मणतो कीं, अशाच रकमांतून रेसिडेन्सी- तील नोकरांस पैसे मिळाले. ह्या साक्षीदाराबद्दल संशय आहे याबद्दल शंका नाहीं, परंतु ह्या गोष्टीविषय दस्तऐवज व इतर स्थितीत झाजपासून स्वभाविक जे अनुमान होतें तेच अनुमान व्याणें सांगितले व त्याचे बोलणें कोणी खोटें पाडलें नाहीं, कारण नर त्याने खोटा मजकूर सांगितला असता तर ही गोष्ट फार स्वरूप रीतीने शानीत करितां आली असती. १८ वर सांगितलेल्या दोन मुख्य गोष्टींमध्ये संबंध आहे की काय, व जर संबंध असेल तर तो कोणत्या प्रकारचा हें पुराव्यावरून शाबीद कसें होतें एवढाच मुद्दा आहे. एकपक्षी गायकवाड यांनी रेरोसेडेन्सीतील कांहीं नौकर माणसांबरोबर गुप्त री- तीनें व्यवहार ठेविला व त्यांस पैसा दिला. दुसरे पक्षीं असें आहे कीं, या नौकर माणसांतील दोन इसम रावजी व नरसू यांनी कर्नल फेर यांस विष दिले ह्या गो ष्टीबद्दल जर भरंवसा ठेविला तर उत्तम प्रकारचा खात्रीलायक निर्विवाद रोती. चा पुरावा आहे. ह्या पुराव्यांतील पुष्कळ भाग रावजी व नरसू यांनी स्वतः दिला. आ. णि जर त्यांनी चमत्कारिक व मोठे मेहेनतीने तयार केलेली अशी खोटी गोष्ट सांगितली नाही, असे मानले तर त्यांच्या जबानीवरून असे स्पष्ट होतें कीं, ज्या गायकवाडांच्या वर्तणुकीस रोसडेंसीतील नौकर लोकांत गुप्त बातमी देण्याबद्दल व आपले वजन खर्च करण्याबदल लांच देणे ह्या गोष्टीपासून प्रारंभ झाला, त्या वर्तणुकीचा शेवट कर्नल फेर यांस विष द्यावे असा झाला. १९ तर मग हे साक्षीदार नी हकीगत सांगतात ती भरंवसा येण्याजोगती नाहीं असे मानण्यास कांहीं संपूर्ण कारण आहे की काय ? आतां असे झणणें आहे की, विष देण्याचा गुन्हा कोणीही केला असो हे इसम त्यांस साथी आहेत व हे त्यांच्याच ह्मणण्यावरून फार दुष्ट आहेत व ह्यांणी आपल्या ममताळू धन्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यांत मार्गे पुढे पाहिलें नाहीं व ह्याबद्दल दोष त्यांच्या बरोबरीचा एक निरपराधी नौकर ह्यावर आणण्याचे कामांत त्यांनी मदत दिली. हे सर्व अगदीं खरें आहे व ह्यामुळे त्यांच्या पुराव्याबद्दल अतिशय मोठा संशय उप्तन्न झाला पाहिजे. व हा पुरावा जे लोक ताडून पाहतील त्यांच्या मनांत अतिशय मोठी खबरदारी उप्तन झाली पाहिजे. परंतु ह्याच वेळेस असेंही लक्षांत ठेविले पाहिजे की, ह्या प्रकारच्या दुष्ट कामाबद्दलचा साक्षात पुरावा साथी लोकांशिवाय इतरांपासून वारंवार मिळत नाही व फक्त ज्या मनुष्यापासून हा पुरावा येतो त्याचेकडे लक्ष देऊन तो मान्य केला