पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. दाखल केली आहेत. नेटिव दरबारांत कशीही चाल असली तरी हिंदुस्थान सरकारा स असे वाटते की, हीं मतें लिहितांना या कमिशनर लोकांनी गायकवाडांविरुद्ध 'पुराव्यांत ज्या गोष्टी शाबीत झाल्या आहेत त्यांचा पूर्ण विचार केला नाहीं. १५ लम किंवा इतर उत्साहाचे वेळीं साधारण रीतीनें रोसडेंन्सीतील नौकर मा- `णसांस गायकवाडांकडून देणग्या मिळत असत, व ज्या व्यवस्थेनें दिल्या असतांना स्यांत कांहीं दोष आहे असें ह्मणर्ता येणार नाहीं, अशा प्रकारचा पुरावा झाला नाहीं. पुराव्यावरून असे शाबीत होतें कीं, फक्त ज्या नौकर माणसांशीं गायकवाड यांचा व्यवहार ठेवण्याचा विचार होता त्यांस त्या देणग्या मिळाल्या आहेत. व या देणग्या या नौकरांच्या स्थितीशी तोळून पाहिल्या असतां फारच मोठ्या होत्या. उदाहरणार्थं रावजीस दिलेली फक्त एक देणगी त्याच्या सर्व वर्षाच्या पगराच्या चौपट होती; या करणावरून पुराव्यावरून असे शाबीत होतें कीं, गायकवाड यांचा रेसिडेन्सीतील नौकर माणसांचा लोभ संपादन करावा असा हेतु नव्हता, परंतु कांहीं महत्वाचें काम करण्याकरता त्यांस लांच देण्याचा त्यांचा विचार होता. १६ महाराज शिंदे यांच्या अभिप्रायांतून जें वाक्य उतरून घेतलें आहे या वाक्यांत सांगितलेल्या चालीपासून आपल्यास दूर ठेवावें ह्याविषयों गायकवाड यांस फार काळजी होती हैं लक्षांत ठेविले पाहिजे. व तो व्यवहार फार वेळ झाल्यामुळे तो निर्दोषी आहे असे ह्मणणे आहे. ह्मणजे बातमी मिळविण्याकरता पैसा देणे. STI- यकवाड यांनी आपल्या जबाबांत असे लिहिलें:- " मी शफतेवर असे सांगतों कीं, रेसिडेंट साहेबांशी हेरासारखे वागावें असें मीं

  • रेसिडेन्सीतील नौकर माणसांस सांगितले नाहीं. किंवा रेसिडेन्सींत काय चालले आ.

हे याची बातमी मिळविण्याचा मी प्रयत्न केला नाहीं. किंवा अशा कामाकरता त्या लोकांस मी कधीं पैसे दिले नाहींत किंवा देवविले नाहीत. " " लग्न किंवा त्याच प्रकारचा दुसरा एखादा उत्साहाचा प्रसंग यावेळी रेसिडेंसीं तौल नौकरांस ज्या देणग्या कदाचित मिळाल्या असतील यांजबद्दल माझें कांहीं एक झणणे नाहीं. माझे दरबारात किंवा रोसडेन्सींत होणाऱ्या किरकोळ गोष्टींबद्दल बातमी एकमेकांस परस्परें मिळाली असेल, परंतु ह्या हेतूनें त्या नौकर माणसांशीं खुद्द मी कोण- त्याही प्रकारचा व्यवहार ठेविला नाही, व ह्या कामाकरितां कांहीं पैसे दिले असे मला माहित नाही. ज्या रीतीने रेसिडेन्सींतील गुप्त बातम्या मजकडे येतील अशी व्यवस्था मी केली नाहीं." १७ रेसिडेन्सींतील नौकरांस ने पैसे दिले ते बाहेर येण्याजोगे नाहींत ह्याविषयीं आणखी विशेष पुरावा आहे. गायकवाडांच्या खासगी हिशेबांत ह्मा पैशांबद्दल कोठेंही नोंद नाहीं. परंतु नवंबर ता० २४ सन १८७३ इसवी पासून तो अक्टोबर ता० १३ सन १८७४ इसवी "पर्यंत त्या जमाखर्चात अशा पुष्कळ नोंदी आहेत की ज्यावरून सालीम, यशवंतराव यांस मोठमोठाल्या रकमा दिल्या असाव्या असे दिसतें. ह्या मनुष्यांनी दिलेल्या माला.