पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल थांचा ठराव. (२९१ ) यावर विरुद्ध प्रकारचा पुरावा नाहीं. वास्तविक खुद गायकवाड सुद्धां ह्या गोष्टी ना- कबूल करीत नाहीत. त्यांनी मोठ्या खबरदारीने लिहिलेला एक दस्तऐवज दाखल केला आहे; त्यांत ते असे ह्मणतात कीं, मी रोसडेन्सीतील नौकरलोकांस स्वतः भेट- लों नाहीं व त्यांस पैसा देवविला नाहीं असे नाहीं, परंतु ह्या गोष्टी मीं बातमी क ण्याच्या इराद्याने केल्या नाहींत. ११ ने विष कर्नल फेर साहेब यांस दिले तें मी दिले असें रावजीचे ह्मणणे, अथवा मी विषाच्या कामांत रावजीस मदत दिली असे नरसूचें ह्मणणे, ह्या दोन गोष्टी एके बाजूस ठेवण्याजोगा विरुद्ध पक्षाकडून पुरावा झाला नाही. किंवा एकाद्या रीतीनें हे दर्शविण झाले नाही असे हिंदुस्थान सरकारास वाटते. १२ इतके झाल्यानंतर हिंदुस्थान सरकारास असें वाटतें की, झालेला पुरावा दोन मुख्य गोष्टी अशा रीतीने शाबीत करितो की, त्यांत विरोध आणणे मुळीच अ इयक्य आहे. - - पहिली गोष्ट अशी कों, गायकवाड यांचा रोसडेंसींतील पांच नौकर लोक यांशी रात्रीचा व्यवहार चालू होता व त्या नौकर माणसांतील तीन असामींस झणजे रावजी, नरसू, अमीना, यांस यांणी पैसा दिला. दुसरी गोष्ट अशी कीं, या नौकर माणसांतील दोन इसम ह्मणजे रावजी व नरसू यांचे कडून त्यांणीं मृत्यु आणण्याजोगें कर्नल फेर यांस विष देवविलें. हिंदुस्थान सरकारास असे वाटत नाहीं की, ज्या तीन कमिशनरांनी निरनिराळे रिपोर्ट केले आहेत, त्यांपैकी एकाचाही वरील दोन गोष्टी खन्या मानण्याचा अभि- प्राय आहे; जरी यांनी हें आपले मत इतक्या स्पष्ट रीतीनें दर्शित केले नाहीं. १३ आर्ता ह्या दोन मुद्यांबद्दलचा पुरावा हा खटला बराच लांब नेतो. बडोद्यांतील गायकवाड यांसारखा मनुष्य रेसिडेंन्सींतील नौकर लोकांबरोबर रात्रीचा गुप्त रोतोनें पुष्कळ व्यवहार ठेवील काय, ही पुढील घडलेल्या गोष्टींच्या पूर्वीची असंभवनीयता- प्रथमारंभी मोठचा अडथळ्यासारखी दिसते. परंतु जेव्हां त्यांनी तो व्यवहार केला असे स्पष्ट होते तेव्हां त्या नौकर माणसांनी ज्या गोष्टी केल्या याचा व ह्या व्यवहा- राचा मुळीच संबंध नाहीं की काय, अथवा त्या गोष्टी त्या व्यवहारापासून निश्चया- प्रमाणे उप्तन्न झाल्या की काय, एवढाच मात्र विचार करणे राहते. ह्या विचाराचे संबंधानें पूर्वीची असंभवनियता गायकवाडांविरुद्ध होते. रावजी व नरसू यांचा गाय- कवाडांपासून पैसा मिळवावा याशिवाय या गोष्टी करण्यांत दुसरा कोणत्याही प्रका- रचा हेतु होता असे सांगण्यांत आले नाहीं; व ज्या दोन गोष्टींच्या मालिका ति झाल्या आहेत त्या कार्यकारण ह्या नात्याने जुळलेल्या आहेत. व त्यांचा एकमेकांशों मुळीच संबंध नाहीं असे नाहीं, हे ह्मणणे अधिक संभवनीय दिसतें. १४ ज्या तीन कामेशनर लोकांनी निरनिराळे रिपोर्ट लिहून दिले आहेत ते रोसे- डेंन्सींतील नौकर माणसांशीं गायकवाड यांचा झालेला व्यवहार अगदी क्षुल्लक आहे असे मानतात ही गोष्ट खरी आहे. त्यांची मतें वरील तीन व चार या पारिनाफांत ३४