पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ७. गोपाळराव मैराळ यांची दिवाणगिरी. गोपाळराव मैराळ यांच्या दिवाणगिरीपासून प्रजेचें हित होण्याची अशक्यता - दिवाणाच्या तंत्रानें मल्हारराव महाराज वागले ना- हीत यामुळे राज्यांत घोटाळा-दिवाणांच्या हाताखाली एक अनु- भवी मनुष्य नेमण्याविषयीं रेसिडेंट साहेब यांच्या उपदे- शाची निष्फलता. मल्हारराव महाराज राज्याधिकारावर आले तेव्हां राज्यकारभाराची रचना कशी होती हें पूर्वी सांगितले आहे. त्यावरून त्यांस विशेष कांहीं करावयाचें उरलें होतें असे नाहीं. जुन्या चाली मोडून नव्या चाली सुरू झाल्या होत्या, व नव्या चालीप्रमाणे काम करण्याची कामदार मंडळीस आठ नऊ वर्षेपर्यंत त्याच पद्धतीप्रमाणे कामें केल्यामुळे माहिती झाली होती, व प्रजेलाही आपला राजा आपल्यावर कोणत्या रीतीनें राज्य करणार हे समजलें होतें. महाराजांचे मुख्य कर्तव्य काय तें येवढेच होतें कीं, खंडेराव महाराज यांचे अंमलांत स्थापित झालेल्या नियमाप्रमाणे काम चालविण्यास व त्या नियमांत जे कांहीं दोष असतील ते काढून टाकून दुसरे नियम स्थापन करण्यास योग्य अशा राजनीति कुशल गृहस्याची दिवाणगिरीच्या अधिकारावर योजना करून व सर्व राज्यकारभार त्याजवर टाकून, आपण स्वस्थपणें राजपदाचा उपभोग घ्यावा; कारण स्वतः राज्यकारभार पाहण्यापुर्ते कांहीं त्यांचे आंगी ज्ञान नव्हते, परंतु महाराजांचे हातून ती गोष्ट घडली नाही त्यामुळे, त्यांचे राज्याचा शेवट लवकरच झाला, आणि हिंदुस्थानचे इतिहासांत एतद्देशीय राजांच्या दुर्वर्तनमालि- केंत एक नवी कडी गुंफली गेली. गोपाळराव मैराळ राव साहेब यांची दिवाणागरीच्या अधिकारावरील नेमणूक अगदीं अर्थशून्य होती. हरीबा गायकवाड यांजकडून अधिकार काढून बडोद्यांतील प्रसिद्ध, सत्कुलोत्पन्न, आणि लोकप्रिय, अशा एका सत्पुरुषास दिला, इतकाच काय तो फेरबदल झाला, परंतु त्यापासून बडोद्याचे राज्यास फायदा होण्याची कांहीएक आशा राज्यकारभाराला उपयुक्त अशा गुणांचा राव साहेब यांचे आंगीं अभाव होता. ब्राह्मणांस वर्षासने करून देणें, विद्वान ब्राह्मणांच्या संभावना करणे, गोसांवी, बैरागी यांस शिध्यांच्या नेमणुका करून देणे, आणि अशाच प्रकारची कांहीं दुसरी धर्म कृत्ये करणे, या पलीकडे कांही त्यांचे ज्ञान नव्हते. त्या सत्पुरुषाने आपले सर्व अयुष्य दानधर्म करण्यांत, व जप, तप, होम करण्यांत व करविण्यांत घालविले होतें, यामुळे त्यांच्या नव्हती.