पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. खरी योग्यता समजून त्यापासून अनुमान करण्यामध्ये मोठे वाकबगार, एकत्र मिळून ज्या मनुष्याच्या वर्तणुकीविषयी चौकशी करण्याचे काम त्यांनकडे सोपविले होते, तो मनुष्य गुन्हेगार आहे असा आपला अभिप्राय देतात, व तो वरिष्ट अधिकाऱ्यांकडून रद्द होत नाहीं, त्या अर्थी अशा रीतीनें दोषीत ठरलेल्या मनुष्याविषयी निदान मो. ठा संशय आहे, असे कबूल न करणे झणजे अशक्य आहे. ८ परंतु कमिशनर लोकांनी केलेल्या रिपोर्टावर हा खटला अवलंबून ठेवावा, हें हिंदुस्थान सरकारास योग्य दिसत नाहीं. हें कमिशन इतर न्यायाच्या कोर्टाप्रमाणे कोर्ट नव्हते, परंतु या खटल्याची चौकशी करून रिपोर्टात हिंदुस्थानसरकारास आ पलें मत प्रदर्शित करावें येवढ्याकरतांच हैं स्थापन केले होतें. जरी सर्व कमिशनर लोक एक मताचे झाले असते तथापि आपण होऊन ह्या खटल्याची चौकशी करा बी, व त्यासंबंधाने कोणता एक अभिप्राय द्यावा है हिंदुस्थानसरकारास आपले कर्त. व्यकर्म आहे असे वाटले असते. ज्याअर्थी कमिशनर लोकांचा अभिप्राय एकमेकांशी जुळत नाहीं, त्या अर्थी त्यांचेकडे व ह्या खटल्यांतील लोकांकडे लक्ष देऊन, हिंदु- स्थान सरकारास असे वाटते की त्यांचा अभिप्राय काय ठरला येवढेच सांगणे पुरें नाही, परंतु तो अभिप्राय ठरण्यांत मुख्यत्वें कोणाचे विचार त्यांचे लक्षांत आले हेही सांगणें जरूर आहे. ९ ज्या तीन कमिशनर लोकांनी निरनिराळी मतें लिहून दिली आहेत, व ज्या मतांचा झोंक वर लिहिला आहे, त्या कमिशनर लोकांची मतें गायकवाडांविरुद्ध सा. क्षीदारांनी दिलेल्या पुराव्याच्या संबंधाने साधारण असंभवनिय गोष्टी अथवा साधारण वर्तणुक याजवर अंशत: अवलंबून आहेत. व खुद पुराव्यांत काही विशेष विरोध अथवा जे कमतरपणे आहेत त्यांजवरही अंशतः अवलंबून आहेत. पूर्वी सांगिलेल्या वि. चारांकडे हिंदुस्थानसरकार प्रथमतः लक्ष देत आहे. ज्या मुख्य मुद्याच्या गोष्टीविष यीं विवाद आहे त्या संबंधाने मुख्यत्वेकरून आपले विचार प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार आहे व पुराव्यांत जी हकीकत शाबीद झाली आहे तिचा बारकाईने विचार करण्याचा त्यांचा हेतु नाहीं, व, याजविषयीं कांहीं माहिती पाहिजे असल्यास या ठ- रावांत नोडलेल्या कागदपत्रांत ती माहिती मिळेल. १०. प्रथमतः असे लिहिले पाहिजे की, गायकवाड व रेसिडेंसातील नोकर लोक यांमध्यें जो व्यवहार झाला असे शाबीद झाले आहे तो व्यवहार फक्त कांहीं व्य क्तींस अनुलक्षून होता व तो रात्रीचा गुप्तरीतीने होत असे व त्याबद्दल पैसाही पुष्क- ळ दिला गेला. ही गोष्ट स्वतंत्र पुष्कळ साक्षीदारांनीं शाबीद केली आहे. हे साक्ष • दार घडलेल्या गोष्टी संबंधी हकीकत सांगतात व यांचा पुरावा मुख्य गोष्टीस अनुस- रून आहे व विरुद्ध पक्षाकडून जबानी होते वेळेस हे उगले नाहीत व बाहेरील गो- ष्टी, जसें ज्या वाड्यांत ते गेले होते त्या वाड्याचा प्रकार, जे लोक त्यांस तेथे घेऊ- न गेले होते त्यांच्या स्मरणांतील गोष्टी, व ज्या लोकांस पैसे दिल्याची माहिती आहे त्यांच्या स्मरणांतील गोष्टी, ह्यांशी ताडून पाहिले असतां बरोबर मेळ जमतो. ह्या मु. -