पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मव्हरनर जनरल यांचा ठराव, ((२८९ ) कांसंबंधी बातमी काढणे ह्या गोष्टी इतर नेटिव, राजे. व्र, ज्या लोकांचा रेसिडेंसीशी संबंध आहे ते लोक यांच्या वर्तनक्रमास अनुसरून आहेत "आणखी त्यांस असे वाटतें कीं, विष घालण्याच्या प्रयत्नाशी गायकवाडाचा संबंध होता है शाबीत झाले नाहीं. यांनी आपला अभिप्राय असा दिला आहे की, मजपुढें ज्या रीतीने सर्व पुरावा झाला, ब, जो माझे मनाचा ग्रह झाला. त्याप्रमाणे, व माझ्या अकलेप्रमाणे मला असे वाटतें कीं, विष घालण्याच्या प्रयत्नाबद्दल आलेला आरोप मल्हाररावांवर शाबीत होत नाहीं. " AF PTS 11-18 8 जयपूरचे महाराज यांचे असे मत आहे की, गायकवाडाने रेसिडेंसींतील नौकर माणसांस कांहीं पैसे दिले व कर्नल फेर यांस विष घालण्याचा प्रयत्न घडला. रोसडेन्सीतील नौकर माणसांशी घडलेल्या व्यवहारसंबंध ते असे लिहितात:- “ अमिना अय्या, व रोसडेन्सींतील इतर नौकर लोक यांनी दिलेल्या जबान्यांवरून असे शानीत होते की, यांस निरनिराळ्या वेळी गायकवाड महाराजांनी कांहीं रक- मा निःसंशय दिल्या आहेत. तथापि ह्या रकमा रोसेडेन्सीतील नौकर लोकांस वा ईट हेतूने सामील करून घ्यावें अशा विचारानें दिल्या नाहीत, परंतु ह्या फक्त गाय. कवाडांपासून मिळालेल्या नजराण्याप्रमाणे आहेत, व असे नजराणे लग्न किंवा इतर उत्साहाचे वेळेस नेहमी लोक देतात. " नंतर पुराव्यांत कोण कोणते दोष आहेत त्या संबंधी महाराजांनी केले आहे. व ह्या दोषाविषयी सविस्तर खाली लि. हिण्यांत येईल. महाराजांनी सरते शेवटीं दिलेला अभिप्राय येणेप्रमाणे. 1 66 वर सांगितलेल्या कारणांवरून जरी कर्नल फेर यांच्या सरबताच्या पेल्यांत वि ष सांपडले व रावजी, नरसू व दामोदरपंत या तीन साथीनी जबान्या दिल्या .त, तथापि विष घालण्याच्या कामांत गायकवाडांचे कोणतेही रोतीने अग होते असे- माझे मन घेत नाहीं. आहे- " ५ राजे दिनकरराव यांचा अभिप्राय बहुत अशीं महाराज शिंदे यांच्या अभिना- याप्रमाणे आहे, व त्याविषयीं येथें विस्ताराने लिहिण्याची जरूर नाहीं. ६ रेसिडेन्सीतील नौकर रावजी याणे आपला वरिष्ठ नरसू याची मदत घेऊन विष दिलें नाहीं, रोसडेन्सीतील दुसऱ्या नौकर माणसांनी ते विष दिले असावे असा अभिप्राय एकाही कमिशनराच्या सूचनेंत येत नाही. ७ कमिशनर लोकांनी दिलेल्या अभिप्रायांप्रमाणे जर ह्या विषयाचा निकाल करणे झाले तर असे स्पष्ट होते की, गायकवाड यांस आपल्यावर आलेल्या आरोपापासून आपल्यास मुक्त करून घेण्याची संधी मिळाली असतांही त्यांनी आपल्यास त्या संश- यांतून मुक्त करून घेतले नाहीं. ज्या सहा कमिशनर लोकांनी या खटल्याची चौ- कशी केली, त्यांपैकी तिघांचे मत असे आहे की, गायकवाड यांजवर आलेले आरोप खरे आहेत. आतां जेव्हां तीन गृहस्थ, या देशांतील रीति भातीत व पुराव्याची