पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८८)) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास , २ वर लिहिलेल्या आरोपाची चौकशी करण्याकरतां कमिशन नेमण्याचा ता०२५ फेब्रुवारी सन १८७५ इसवीचा जाहिरनामा ३' खटल्यांत आलेला पुरावा, व दाखल केलेल्या निशाण्या यांचे सरकारी हंशील. ४ बारिस्टर लोकांनी काढलेल्या मुद्यांचा छापील सारांश. ir tt ५ मार्च ता० ३१ सन १८७५ इ. रोजी सर आर. कौच, सर आर. मीड, आणि मि. पी. एस. मेलव्हिल यांनी एकत्र केलेला रिपोर्ट." ६ महाराज शिंदे निराळा अभिप्राय यांनी तारीख २७ मार्च सन १८७५ इसवी रोजी दिलेला EPTEMER FOR •' जयपूरचे महाराज यांनी ता० २७ मार्च १८७५ इसवी रोजी निराळा दिले-" लेला अभिप्राय.F BIF ८ राजे सर दिनकरराव यांनी ता० २६ मार्च सन १८७९ इसकी रोजी दिले. ला अभिप्राय १ वर जे कागद वाचले ह्मणून लिहिले आहे, व जे या ठरावांत जोडले आहेत ते मल्हारराव महाराज गायकवाड यांच्या वर्तणुकीविषयों झालेल्या चौकशींत कशा गोष्टी घडल्या हे दाखवितात, व त्यांत जो ठराव करण्यांत आला तो स्पष्टपणे सांग- ण्याच्या संबंधाविषयी त्या कागदांत लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देण्याची अवश्यकता नाहीं. ने राजे व थोर गृहस्थ या खटल्यांत कमिशनर नेमले गेले त्यांनी आपले श्रमाचे काम पूर्ण केले आहे, व, खटल्यासंबंधी आपले निरनिराळे विचार सादर केले आहेत. आतां ह्या चौकशीत पुढे आलेल्या पुराव्यावरून, व, बारिस्टर लोकांच्या बोलण्यांत आलेल्या मुद्यावरून, व, निरनिराळ्या कमिशनर लोकांनी दिलेल्या अभिना यांवरून सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून हिंदुस्थान सरकारचे काय मत झाले आहे हे फक्त प्रदर्शित करण्याचे राहिले आहे. २ सर रिचर्ड कीच. सर रिचर्ड मोड, व, मि० मेलव्हिल ह्या सर्वांचा अभिप्राय असा आहे की, गायकवाडांवर जे गुन्हे केल्याबद्दल आरोप आला आहे तो आरोप खरा आहे; त्या गुन्ह्यानैको अति वाईट असा गुन्हा येथे सांगणे जरूर असल्यामुळे असे लिहिण्यांत येत आहे कीं, कमिशनर लोकांच्या मतांप्रमाणे कर्नल फेर साहेबांवर विषप्रयोग करण्याचे कामांत मल्हारराव गायकवाड यांनी कांहीं लोकांस फूस दिली असे शाबीत आहे. ३ महाराज शिंदे यांचा असा अभिप्राय दिसतो की, गायकवाढ व रेसिडे- सीतील नौकर यांजमध्ये झालेला व्यवहार, व, कर्नल फेर यांस दिलेले विष या दोन गोष्टी शाबीत आहेत, परंतु हे मत ते स्पष्टपणे सांगत नाहीत. नौकर माणसांशीं अ सलेल्या संबंधाविषयी त्यांनी असे लिहिले आहे:-"नौकर माणसांशी रात्री किंवा दिवसा असलेल्या संबंधाविषयी आमचे असे मत आहे की, ही गोष्ट फार महत्वाची नाहीं. अशा भेटी, व, लग्न किंवा इतर उत्साहाचे वेळी देणग्या मिळविण्याकरितां विनंती, व, रेसिडेंट साहेबांची मेहेरबानगी मिळविण्याचे उपाय, व, तसेंच एकमे