पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरेल यांचा ठराव. ( २८७ ) आपल्या देशांतील राजाविषयी हिंदुस्थानांतील लोकांची किती मोठी भक्ती आहे, यांचें हें एक मोठे प्रमाण आहे. मल्हारराव महाराज चांगला राजा नव्हता तथापि त्यांस दोषमुक्त करण्यासाठी विलायतेहून बारिस्टराचा ब्रिटिश इंडियांतील एका राजाधानीतील लोकांनी सत्कार करावा है कांहीं राज्यभक्तीचें सामान्य प्रमाण नाहीं. इंग्रज सरकारच्या प्रजेस जर आपल्या देशांतील राजांची राज्ये इतकी प्रीय आहेत. तर मग देशी राजांच्या प्रजेस किती प्रीय असतील हे काय सांगावें ! ! त्यांत ब्रिटिश राष्ट्राच्या मोठेपणाविषयी तर असे चांगळे अर्थदर्शक शब्दच मला सुचत नाहीत की ज्यांचा उपयोग केल्याने योग्य रीतीचे वर्णन केल्याचें श्रय येईल. मल्हारराव महाराज यांजवर आणलेल्या आरोपास असे रूप दिले होते की त्यांनी राणीसरकारच्या विरुद्ध अपराध केला होता आणि सारजंट बालंटाईन महारा- जांचा पक्ष घेऊन इंग्रज सरकाराशीं भांडावयासाठी हिंदुस्थानांत आले होते. त्यांचा मुंबई शहरच्या लोकांनी सत्कार करावा आणि ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तोंडाकडे पाहून स्वस्थ बसावे, ही किती सुंदर राजनीति व किती मोठा प्र. जेचा स्वतंत्रपणा! खरोखर हिंदुस्थानांतील राजे रजवाडे यांस व प्रजा यांस आपले अत्युत्तम आणि टिकाऊ कल्याण व्हावे, अशी इच्छा आहे तर त्यांनी इंग्रज सर- कारचें राज्य पुष्कळ वर्षे हिंदुस्थानांत असावे, अशा करितां प्रातःकाळी नित्य उ ठून इश्वराची प्रार्थना केली पाहिजे. मल्हारराव महाराज पांजवरील आरोपाच्या शाबितीविषयी कमिशनच्या अधि काऱ्यांमध्यें मत भेद पडळा. तीन युरोपियन अधिकाऱ्यांनी महाराज यांजवर ठेवलेले चार आरोप शाबित आहेत असे ठरविलें. आणि महाराज शिंदे अलिजा बहादर व जयपूरचे महाराज, आणि राव राजे दिनकरराव यांच्या अभिप्रायास असे आढ़ें कीं, महाराजांवर एकही आरोप लागू होत नाही. नामदार गवरनर जनरल यांनीं मुकदम्याचा फैसला लिहिला आहे त्यांत दोन्ही पक्षांचे अभिप्राय घेऊन त्याबद्दल विचार केला आहे. सबब तो फैसला सा- द्यंत येथे लिहिला असता दोन्ही पक्षांच्या भिन्न अभिप्रायांची कारणे व त्यांचे विचार लोकांस कळतील, पास्तव दोन्ही पक्षांच्या अभिप्रायांचा निराळा उल्लेख करण्यांत आला नाहीं. नामदार गवरमर जनरळ यांचा ठराव खाली लिहिला आहे. खाली लिहिलेले कागद वाचले. १ कर्नल फेर बडोद्यांतील ब्रिटिश सरकारचे रेसिडेंट, यांस विष घालण्याचा प्रयत्न घडल्याबद्दल, मल्हारराव महाराजांवर आलेल्या आरोपाची चौकशी करण्या- बद्दल त्यांस गायकवाडाचे गादीवरून तूर्त दूर करण्याकरिता ता० १३ जानेवारी सन १८७५ इसवीचा जाहिरनामा.