पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. वयास जागा मिळत नव्हती. आणि ही न्यायसभा चित्रपटाप्रमाणे भासत होती. मध्ये कोणी हूं कां चूं करीत नसे. अशी श्रोत्यांची मनें तल्लीन होऊन जात असत. पोलिसांच्या वर्तनावर या वक्त्यांनी टीका करण्यास आरंभ केला म्हणजे त्यांच्याविषयीं श्रोत्यांच्या मनांत पराकाष्ठेची तिरस्कार बुद्धि उत्पन्न होत असे. दामोदरपंत आणि रावजी यांच्या पुराव्यावर त्यांनी चर्चा केळी म्हणजे त्यांच्या दुष्टपणा बद्दल श्रोत्यांच्या अंतःकरणांत संताप उप्तन्न होत असे, महाराजांवर पडलेल्या विपत्तीचें त्या वक्त्यानें वर्णन केले म्हणजे लोकांच्या मनांत दया उप्तन्न होऊन त्या श्रोतृसमुदायत जे राज- निष्ठ होते त्यांच्या नेत्रांतून अश्रुधारा चालत असत. या प्रमाणे प्रत्येक प्रसंगी लो- कांच्या मनोवृत्ति त्या वक्त्याने आपल्या वाकूपाटवाने अगदर्दी आकर्षून घेतल्या होया मल्हारराव महाराज यांच्या विरोधपक्षीय मंडळींच्या वृत्तीवर मात्र त्या भाषणापासुन कांहीं आसर झाला नसेल तर न कळे ! महाराजांच्या निरपराधीपणाविषयीं तर कोणास संशयच उरला नाहीं. सारजंट बालंदाईन यांच्या भाषणांतील मुद्दे खंडन करण्याकरितां अडव्होकेट जनरल यांनी शेवटीं भाषण केळें तें फार लांब आहे. सारजंट बाळंटाईन यांचें भाषण संपल्याबरोबर श्रोत्यांनी आपआपल्या वाटा धरल्या. यावरून त्यांचे भाषण मनोरम होईल असे त्यांस बाटलें नाहीं हे स्पष्ट होते. तेव्हां या भाषणाचें मराठी भाषांतर करण्याचा खटपटीत पडून मी तरी हा ग्रंथ उगीच कां वाढवावा? विषयाचें महत्व, काळाची अनुकूलता, आणि ग्रंथामध्ये जागा, इतक्या गोष्टी अनुकूल अस ल्या पाहिजेत. त्याप्रमाणे पाहिले असतां एकही अनुकूलता नाहीं. भडव्होकेट ज नरल यांचे भाषण मनोवेधक, आणि उपपत्तिावेशिष्ठ नसून त्याचे भाषांतर करण्यास अवकाश नाही. आणि श्रीमंत मल्हारराव महाराज यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीचा इतिहास सहाशे पानांपर्यंत जाऊन पोहोचला आहे यामुळे ग्रंथ अधिक वाढवि- प्याची सोयही नाहीं. तारीख १८ मार्च सन १८५५ रोज स्कोबळ साहेब यांचें भाषण आटपलें, हा कमिशन बसल्याचा विसावा दिवस. त्या दिवशों कमिशनचें काम खलास होऊन, सर्व अधिकारी त्या बद्दलचा विचार करण्यास मुंबईस एकत्र झाले. सारजंट बाटाईन यांनी ही महाराजांची व त्यांच्या राण्या यांची भेट घेऊन, व त्यांस महाराज निर्भय आहेत असें खातरजमापूर्वक सांगून लागलींच बडोदे सोडलें. मुंबईहून बडोद्यास जातांना रेल्वेच्या स्टेशनावर लोकांनी जसा त्यांचा स- त्कार केला, तसाच ते बडोद्याहून मुंबईस परत गेले तेव्हांही केला. विलायतव्या आंगबोटींत बसण्याकरितां ते पाळवाच्या बंदरावर आले तेव्हां त्यांस मान देण्या करितां मुंबईतील सदृहस्थांचा मोठा समुदाय त्यांच्या भोवती गोळा झाला होता, पुष्पांच्या हारांची तर त्यांजवर वृष्टी होत होती. त्यांस एक मानपत्र देण्यांत आलें, व्यांजवर हजारों लोकांच्या सह्या होत्या. व त्यांस एक शालजोडी कोणी नजर केली होती.