पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण, (२८५) ताब्यांत जे लोक आहेत, त्यांस साक्षीच्या पिंजऱ्यांत भी होऊन कधीं उभे करणार नाही. हा विचार वाजवी असो किंवा चुकीचा असो आणि प्रसंगी मी जे काही क रीत आहे त्याचा आधार माझे विचारावर आहे. आणि मला में उचित वाटेल तेच करावें हें ही रास्त आहे. या न्यायसमेपुढें जो पुरावा दिला आहे तो अगदी मना- ची खातरजमा होण्यासारखा नसून महाराजांवर आणलेले आरोप अगदी खोटे आहेत. महाराज, या मुकदम्याच्या संबंधाने मी नम्रपणानें आणि प्रायशः अपूर्णत जे माझे विचार आपल्यास निवेदन केले त्यांजकडे आपण लक्ष दिले याबद्दल मी आपला फार ऋणी आहे. माझे विचार सिद्धांता मासक असोत परंतु ते विचारात घेण्यास योग्य आहेत असे समजून मनापासून आपल्यापुढे सादर केले असून, आपण त्यांजकडे जसें लक्ष दिलें तर्से पुढेही द्याल अशी माझी खातरजमा आहे.. गायकवाडांसारख्या मोठया पदवीच्या राजांवर आलेले आरोपांबद्दल चौकशी कर- ण्यासाठी कमिशन नेमणें हें हिंदुस्थानांत पहिर्लेच उदाहरण आहे. या मागे अशा प्रसंगी गवरनर जनरल कसे वर्तन करीत असत हे आपल्यास इतिहासावरून माही- त आहे; परंतु या कामांत नामदार व्हाईसराय साहेब यांनी इंग्रजी कायद्याची आ.. णि आपल्या सारख्या मोठ्या पदवींच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली याबद्दल मला फार संतोष वाटतो. महाराज, आतां मला शेवटी आपल्यास पदर पसरून एवढेच सांगावयाचें आहे कीं, या दुर्दैवी राजाच्या तर्फे जे कांहीं सांगितलें पाहिजे होतें, तें संपूर्ण रीतीन सांगितळें गेळें आहे असे आपण मानूं नये; कारण हा मुकदमा समजून देण्याकरतां आकलन शक्ति, सामर्थ्य आणि वाकुपाटव हे गुण जितके माझ्या अंगीं असले पाहिजे होते, तितके माझ्या अंगी नाहीत, हें भी पोकळ निगवपिणाचा डौल मिरविण्यासाठी सांगतों, असे नाहीं. यास्तव या मुकदम्यांतील पुराव्याकडे आपण सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करावें. मला असा भरंवसा आहे की, आपल्या सूक्ष्म अव लोकनांत अशा कांहीं गोष्टी आपल्यास सांपड़तील कीं यांजवर मी जरी भरंवसा, ठेवला नाहीं तरी त्याजवरून महाराज अगदी निरपराधी आहेत असे स्पष्ट कळून, यावें. महाराज, हा राजा ज्या पुराव्यावरून गादीवरून ओढून काढला आहे, ज्या पुराव्यावरून त्याच्या लोकांपुढे त्याचा मानव्हास केला आहे आणि चौकशी चालली असता त्यास अनुकूल असा एक शब्दही बोळण्यास कोणी पुढे येऊं नये, अशा स्थितीत ज्या पुराव्यावरून त्यास आणले आहे त्या पुराव्यावरून एखा- द्या अट्टल भामट्यावर देखील आपण आरोप ठेवणार नाहीं, मग अपराधाच्या शाबिती विषयीं तर बोलावेंच कशाला. सारजंट बालंटाईन यांचे श्रोतृमनोभिराम भाषण ऐकून श्रोत्यांस पराकाष्ठेचा आल्हाद झाला होता आणि भाषण संपल्यावर ती सभा काही वेळपर्यंत अगदीं स्तब्ध झाली होती. या विद्वानशिरोमणीच्या भाषणास तारीख १३ मार्च शनवार रोजी आरंभ होऊन तें तारीख १६ मार्च रोजीं समाप्त झालें. रविवार रेवरीज करून अडीच दिवस पर्यंत तें भाषण चालले होते. त्या दिवसांत कोर्टात लोकांस बसा-