पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आ- बरोबर नव्हते त्यांत इंग्रजसरकारच्या राज्याधिकाराळा कांहीं अपाय करावा वगैरे बातमी मिळविण्याचा कांहीं महाराजांचा दुष्ट हेतू नव्हता. कर्नल फेर यांनीं आप- ला छळ करण्याचा क्रम धरला आहे तो चालूच आहे, आपल्या शत्रूंशी ते मसळ. तो करीतच आहेत, किंवा त्यांच्या मनाची कांहीं शांती होऊन आपल्याविषयीं त्यांच्या -मनांत काही तरी करुणा उप्तन्न झाल्याची लक्षणे दिसत आहेत, हीच काय तो बातमी मिळविण्याविषयी त्यांनी प्रयत्न केला असेल तर असेल. डव्होकेट जनरल स्कोबळ साहेब यांनी सारजंट बालंटाईन यांच्या भाषणांतील मुद्दे खंडन करण्यासाठी जीं उत्तरे दिलीं त्यांत या आरोपाच्या संबंधानें त्यांचे असे झण- णें आहे कीं, गायकवाडांच्या आणि रेसिडेंटांच्या बातम्या मिळविण्याच्या रीतीत काय तफावत आहे याविषयीं वाटाघाट करण्याची मला काही गरज नाही परंतु दुस- ●रा एक त्यांत मोठा भेद असा आहे की, कर्नल फेर यांजकडे स्वेच्छेनें ने लोक बातम्या देण्यास येत होते त्यांजकडून त्यांस दरबारांतील माहीती मिळत होती. आणि गायकवाड तर लांच देऊन बातम्या मिळवीत होते. या त्यांच्या ह्मणण्यातील इंगित काय तें हें कीं, कर्नल फेर यांस कांहीं पैका द्यावा लागत नसे; लोक आप 'ण होऊन बातम्या देण्यात येत असत ह्मणून त्याबद्दल त्यांजकड़ेस कांहीं दोष लागू होत नाहीं. आडव्होकेट जनरल यांनी सारजंट बाउंटाईन यांच्या या मुद्यावरील भाषणाचे खंडन करण्यांत ज्या कारणांची योजना केली आहे तें फारच चमत्कारीक आहे ह्यांत कहीं संशय नाही. देशी राज्याच्या दरबारांतील रेसीडेंटांनी एखाद्या कारस्थानी मनुष्यास कानी लागूं दिल्याने त्याला किती योग्यता येते, पैका मिळवि- ण्याची किती द्वारें मोकळी होतात आणि राज्यांत त्याचें किती वजन वाढतें. था- "विषयीं स्कोबळ साहेब यांस कांहीं देखील माहिती होती असे वाटत नाही.. सारजंट बालंटाईन--मीं साक्षीदारांच्या उलट तपासणीत आणि माझ्या भाषणांत या मोकदम्यांतील सर्व गोष्टी अगदी व्यक्त केल्या आहेत आणि आतां त्याचा शेवट निर्णय करणे हें काम आपले आहे. साळम आणि यशवंतराव यांनी केलेल्या कृत्यांची जबाबदारी महाराजांवर नाहीं व त्यांनी काय केले त्याची माहिती ही त्यांस नाहीं; दामोदरपंताचा आणि त्यांचा निकटसंबंध होता है आपल्यास दानोदरपंतानें सांगितले आहे. सालम याची दामोदरपंताबरोबर आणि यशवंतराव याची रावजीबरो बर तुलना करून पाहतां ते कांहीं कमी गुन्हेगार आहेत असे नाहीं. तथापि पोलिसां- विषयीं मला अनुभव आळा आहे. त्यावरून कदाचित महाराज सांगतील तरी मी त्यांस साक्षी देण्याकरिता बोलावण्याची कधीं सला देणार नाहीं. पोलिसांचे abribery of the ministers of a native Durbar is so very common, it is astonishing that you should have been able to transact any business at the Peshwa's Durbar to this rmoment, without having had recourse to it." ( Selections from Wellington's Des- patches by Owen Pp. 274, 276.)