पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आतां महाराजांवर जो दुसरा आरोप आणला आहे त्याविषयी विचार करतो. तो आरोप कसा ठेवता आला याचीच मला काही उमज पडत नाहीं. रेसिडेंटाच्या चाकरांक डून त्यांच्या मालकास कांहीं इजा करविण्याचा हेतु असता तर कदाचित तो आपराध झाला असता; परंतु तसे कांहीं नाहीं सबब तो अपराधच होत नाही. जर महाराजां- स असे वाटले असेल की, रेसिडेंन्सीमध्ये आपल्या बद्दल काय चालतें त्याबद्दल बा- तमी मिळवावी, आणि त्यांत रेसिडेंटांस कांहीं उपद्रव देण्याचा उद्देश नसेल तर त्या कृत्यास आपण कोणत्या रीतीनें अपराध मोजाल हे मला कळत नाहीं. दरबा. रांत काय चालते याबद्दल बातम्या मिळविण्याकरितां कर्नल फेर यांनी लोकांस का- मास लावावे आणि महाराजानी बातमी मिळविल्याबद्दल त्यांजवर आरोप ठेवावा हे फार चमत्कारीक आहे. कर्नल फेर लोकांबरोबर नेहमीं खलबतें करीत असत. आ. णि दरचारांतील बातम्या मिळवीत असत याविषयी कोणाच्यानें तरी नाहीं ह्मणवेळ काय कर्नल फेर यांनीं त्या बातम्या देणारांस प्रत्यक्ष पैका दिला नसेल, परंतु त्यांनी त्या लोकांवर विश्वास ठेविल्यामुळे त्यांस पैका मिळविण्याचे अनेक मार्ग मोकळे झाले होते. दरबा- रांमध्ये खलितां लिहिण्याचा विचार चालला आहे ही बातमी भाऊ पुणेकर याने मिळ विली तेव्हां त्याने दरबारच्या चाकरांत लांच दिलीच असल त्या वांचून त्यांस तो बातमी मिळते कशी! आणि महाराजांनी ज्या बातम्या मिळालेल्या त्यांत कांहीं देखील अर्थ नाहीं. पण कर्नल फेर यांनी खलित्याच्या संबंधाने जी बातमी मिळविली ती फार महत्वाची होती. कर्नल फेर यांस बातमी देणारे पुष्कळ होते ते नेहमीं त्यांस बा- तम्या देत असत, आणि यांत भाऊ पुणेकर हा प्रमुख होता. हे नर अगदर्दी स्पष्ट आहे की कर्नल फेर जसे चार चक्षु होऊन बसले होते तशा प्रकारचे महाराजांनी बर्तन केलें नाहीं तर त्याबद्दल महाराजांवर आरोप ठेवणे फारच अयोग्य. सारजन्ट बालंटाईन यांनी सदहूप्रमाणे महाराजांवरील दुसऱ्या आरोपाचे खंडण करून नंतर त्याबद्दल अमिना आया वगैरे साक्षीदारांनी साक्षी दिल्या त्यांजवर चर्चा केली आहे. तो त्यांच्या भाषणांतील भाग मी मुद्दाम गाळला आहे; कारण महाराज यांजवरील हा आरोप किती क्षुद्र आहे हे सारनन्ट बालंटाईन यांच्या या प्रकर्णावरील उपोद्वाताव- रून स्पष्ट झालेच आहे. कर्नल फेर यांनी दरबारांत काय चालतें यावद्दल गैर काय- द्यानें महत्वाच्या बातम्या मिळवाव्या आणि महाराजांनीं कांहीं क्षुद्र बातम्या मिळवि- ल्याबद्दल त्यांजवर आरोप ठेवावा यापेक्षां असमंजसपणा तो कोणता असावयाचा ? लार्ड नार्थ ब्रूक यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाराजास अधिकारावरून सरिप- ड केले त्यांत विषप्रयोगाच्या आरोपाचा मात्र उल्लेख आहे असे असतां मागून आ. णखी तीन आरोप उभे केले हे कोणाच्याही प्रकारें बाजवी नाही. यांत इंग्रजसरकार. च्या राज्याविरुद्ध कांहीं कारस्थान करण्याच्या बुद्धीने मल्हारराव महाराज बातम्या मागवीत नव्हते, रेसिडेंट आपल्याविषयीं चांगले बोलतो की चाईट बोलतो वगैरे अ. शा प्रकारच्या क्षुद्र बातम्या त्यांस मिळत असतील. हेर कामास लाऊन बातम्या मिळविणे हे काम चोरटेपणाचे असल्यामुळे ते राज-