पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारनंट बालंटाईनचें माषण. ( २७९ ) गायकवाड महाराज यांचें आचरणांत अशी कांहीं लक्षणें होती की, त्यांवरून ते त्या कामांत लिप्त होते असे दिसून यावें! आपण असें माना की, कर्नल फेर यांनी सांगितलें तें खरें आहे. पण तारीख ९ रोजी जे घडले त्याविषयीं महाराजांस माहिती होती याविषयों कांहीं देखीळ पुरावा नाहीं. रेसिडेंटाच्या बंगल्याखालीं कांहीं बंदुकांच्या दारूचीं पिपे भरली नव्हतीं व तीं उडविण्याचा दिवस व तास नेमला नवता की, त्या कर्माचे सगळे सहायकारी आतां काय होते त्यांची वाट पहात बसले होते. रावजी यानें अमुक दिवशीं अमुक वेळेस विष कालवावे असा कांहीं संकेत झाला नवतां सारांश महाराजांस त्या बद्दलची माहिती होती असा कांहीं देखील पुरावा नाहीं. महाराजांनी त्या दिवशी जे कांहीं वर्तन केलें तें अपराधी मनुष्याच्या वर्तनाप्रमाणे नसून नेहमींच्या सांप्रदायाप्रमाणे होते. पूर्व देशांतील राजे यांच्या मनोवृत्तेि कशा असतात हे मला माहीत नाहीं. परंतु नसें आपण मनुष्य भाहों लर्सेच तेही मनुष्य आहेत आणि त्यास मनस्ताप व भय आहेच आणि आपण जर खुन्याच्या आचरणाकडे लक्ष दिले तर त्यांच्या वर्तनांत असें कांहीं चिन्ह दिसतेंच कीं तेर्णेकरून तो अपराधी आहे असे आपल्या लक्षांत यावें. परंतु महाराजांच्या वर्त नांत तसे कांही नवतें, ज्या लोकांनी महाराजांवर तुफान घेतले आहे त्यांच्या करा- मतीला धिःकार असो. ज्यांनी त्या दुर्दैवी राजांवर अपशब्दांचा वर्षाव केला आहे, वर्तमानपत्रांला खोट्या बातम्या दिल्या आहेत, आणि न्यायसभेतील अधिकारी यांस त्यां च्या कर्तव्यकर्मापासून वहिष्कृत करण्याचा, व त्यांचें मन दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांस धिःकार असो. इग्लंडांतील वर्तमानपत्रांत जर अशी चर्चा झाली असती तर त्या वर्तमानपत्रांच्या एडिटरांची लोकांनी त्यांच्या नन्मभर कुत्सा केली असती. त्या हतभाग्य राजाविषयीं एका वर्तमानपत्रांतील लेख वाचून माझें अन्तःकरण अ- गदीं संतत्प घाले आहे. ज्या देशांत वर्तमानपत्रांला स्वातन्त्र्य आहे व वर्तमानकर्ते अबूदार आहेत तेथें असा मनुष्य फार विरळा, आणि त्यांत जर कोणी मनुष्याने राजा- च्या विरुद्ध कांहीं मजकूर लिहिला तर त्यापासून त्यांची फार अपकीर्ति होईल आणि लोक त्यांची निंदा करतील. परंतु येथें तर एका वर्तमान पत्रांत मजकूरावर मजकूर येत आहेत आणि तसे करण्याचा हेतू असा आहे की, या न्यायसभेने कोणी कडून तरी महाराजांस अपराधी ठरवावें. पण असे करण्यांत त्यांनी आपणास जगापुढे नीच मात्र करून घेतलें आहे. आतां कर्नल फेर यांच्या उलट तपासणीच्या पूर्व भा गावर चर्चा करण्यास मी इच्छित नाहीं. डाक्तर ग्रे यांस यांनी पत्र लिहिलें त्यांत मला गुप्त आणि विश्वासाची बातमी मिळाली आहे कीं, मला विषप्रयोग केला सांत सोमल, हियाची भुकी, आणि तांबे हे तीन पदार्थ आहेत, असे लिहिलें होतें. मी कर्नल फेर यांस आग्रहपूर्वक विचारले की ही बातमी तुह्मांस कोणी सांगितली त्याचे नांव मला सांगा. त्यावेळेस त्यांनी ने आढेवेढे घेतले ते आपल्या लक्षांत आहे- तच. सरते शेवटीं ती बातमी देणारा भाऊ पुणेकर होता असें निर्दशनास आलें. कर्नल फेर यांस सरबताची कळकट चव लागली होती त्याचे मूळ त्यांचा आपल्यास एकंदर गोष्टबिरोबर विचार करावयाचा आहे.