पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. चालविण्यास योग्य होते, आणि त्यांच्याच तंत्रानें त्या निरक्षर मराठ्यांस वागावे लागत असे, यामुळे राज्यकारभार बरा चालला होता. बडोद्या सारख्या मोठ्या राष्ट्रामध्ये लोक मोठे विद्वान होते असे म्हणून मी माझ्या लेखणीचा टाक विटाळणार नाही, परंतु त्यांत पुष्क- ळ उत्तम अनुभवी होते यांत संशय नाहीं, आणि अनुभवाची जितकी किंमत आहे तितकी नुस्त्या विद्येची नाहीं. ज्याचा बडोद्याच्या राज्यांतील लोकांशी दृढ परिचय, राज्याच्या रीतिभातीची पूर्ण माहिती, आणि देशी राज्याविषयों परम आत्मभाव, असा एक विद्वान आणि अनुभवी गृहस्थ दिवाणगिरीसाठी शोधून काढिला असता म्हणजे बस होतें. त्याच्या उपरीपणाखाली काम करण्यास पुष्कळ लोक हुषार होते व आहेत. दहा रुपयांचा कारकून देखील बाहेरून आणून आज बडोद्याच्या जुन्या लोकांस अगर्दी भिकेस लाविलें, तसे करण्याची जरूर नव्हती. व खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीत सर्व कामदार लोक बडोद्यांतील रहिवाशीच होते. त्यांच्यामध्ये बडोद्याचा राज्यकारभार चालविण्याचे ज्ञान नव्हते, तर खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीत त्यांनी जे कायदे केले ते आज उत्तम रीतीने लागू पडतात, हें कसे घडले? राजा सर टी. माधवराव यांच्या कारकीर्दीस आरंभ झाल्यावर सन १८७५-७६ चे सालचा रिपोर्ट झाला त्यांत गव्हरनर जनरल यांचे स्पेशल एजंट मेहेरेबान मेलव्हिल साहेब यानीं असे लिहिले आहे कीं, दिवाणी आणि फौजदारी कायदे खंडेराव महाराज यांच्या कारकी- दर्दीत तयार केले होते, आणि ते आज उत्तम रीतीने उपयोगी पडतात असे मला कळ- ण्यांत आले आहे. * नामदार गिब्स साहेब यानी देखील आपल्या मिनिटांत असे लिहिले आहे कीं, बडो- द्याच्या राज्यांत ज्या पद्धतीने राज्यकारभार चालतो ती पद्धत लोकांस फार सुखावह आहे. फक्त पवित्र मनाने मात्र तीस अनुसरले पाहिजे. +

  • They were prepared in Maharaja Khunde reign, and I am informed that

they answer admirably ( Report on the Administration of the Baroda State for 1875-76, Page 71.) + As regards Baroda itself, I am inclined to think that the system of Govern- ment in existence is in itself perhaps the best for the people, if only it were honestly and purely worked. ( Blue Book, No. 1, Page 349).