पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास, हें बरें. कर्नल फेर यांच्या साक्षीवर टिका करणे हा विषय मला फार मौजेचा वाटतो. त्या संबधाने माझे भाषण जरी नितराम स्तुतीपर असणार नाहीं तथापी माझ्या भा षणांत अतिशय कठोरपणा आणल्यावांचून त्यांच्या पुराव्यावर टिका करण्यास मला कांहीं अशक्य पडणार नाहीं. कर्नल फेर यांची मी उलट तपासणी करीत असतां त्यांस कसा संताप चढला होता आणि खरा दाव घातल्यावांचून अगदर्दी खरी गोष्ट सांगण्यांत देखील त्यांनी किती आढेवेढे घेतले होते त्याकडे आपलें चित्त नेणें हें अस्वाभाविक नाहीं. त्यांच्या कपाळावर एक गळू झाले होते त्यास लावण्याच्या प ट्टींत सोमल घातला होता असे आपल्या मनांत भरवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. हें आपल्या लक्षांत आहेच. हें जें त्यांच्या मनांत भरलें होतें तें नितराम खो- टें ठरले आहे. डाक्तर सिवर्ड यांस त्यांनी पत्र लिहिले त्यांत तारीख ९ रोजी ते ज्या भावना आपल्यास झाल्या ह्मणून ह्मणतात तशा भावना आलीकडे दोन तीन दिवसांपासून मला होत होत्या असे लिहितात आणि त्या दिवशीं तर त्यांस विष प्रयोग केला नव्हता. ज्या दिवशी त्यांस खरोखर विषप्रयोग झाला ह्मणून ह्मणतात त्या दिवशीचे कथानक फार विलक्षण आहे. कर्नल फेर ह्मणतात कीं मी सुमारें आर्धातासपर्यंत लिहिले आणि एकाएकी मला मळमळून आले; माझ्या मनांत एकदम असा विचार आला की हा सगळा सरबताचाच परिणाम आहे. कारण ते मला नेहमीं चांगळें लागत नाहीं. तें पुन्हा पिण्याचे मन होऊनये ह्मणून मी तें सगळे फेंकून देण्याचा यत्न केला. सरबत फेंकून देण्याचे कारण फार चमत्कारीक आहे आणि ते कमिशनाला क्वचितच ग्राह्य होईल. मीं तर माझ्या चाकरास बो- लावून विचारलें असतें कीं, असें वाईट डाळिंबाचें सरचत मला देण्यांत तुझा उद्देश तरी काय आहे; आणि तो जर सगळा प्रवाही कायम राहिला असता आणि त्याचें तत्वान्वेषण झाले असतें तर फार चांगलें झालें असतें. डाक्टर सीवर्ड यांनीही त्यां च्या हवाली केलेल्या सरबतांतील प्रवाही फेंकून देऊन नुसता गाळ मात्र ठेविला. हे ही चांगले केलें नाहीं. चाकर लोकांस न विचारतां सरबत फेंकून देणे, सरचताची चव कळकट होती असे ह्नणणें, आणि त्या गदळाचा रंग काळा होता असे सांग- णें ह्या गोष्टी अगदीं विलक्षण आहेत. या मुद्यावर नीं पूर्वी व्याख्या केली आहे आणि तिची काय किंमत असे हे ठरविण्याचें काम आपल्याकडे सोपविलें आहे. कर्नल फेर यांनी विषप्रयोग झाला त्या दिवशी मुंबई सरकारास पत्र लिहिले ब्यांत असे लिहिले आहे कीं, महाराज माझे भेटीस आले तेव्हा त्यांस मी सामोरा गेलों आणि दिवाणखान्यांत आह्मी बसल्यानंतर मीं महाराजांची तबियत विचारली तेव्हां त्यांनी मला सांगितले की माझी प्रकृती अलिकडे चांगली नव्हती वगैरे. आता याव- रून स्पष्ट होतें कीं, कर्नल फेर यांनी महाराजांस विचारले तेव्हां त्यांनी आपल्या प्रकृतीची स्थिती सांगितली. महाराजांनीच प्रथम भाषणास सुरवात केली आणि कर्नल फेर यांस भावना होत होत्या त्या सारख्याच आपल्यास होतात असें सांगित- क्याविषयीं कांहीं देखील प्रमाण नाहीं. महाराज, आपल्यास असे वाटतें काय कीं,