पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. (२७७) स्वतः होऊन विहिरींत उडी टाकली याबद्दड खटला चालविणारांकडून पुरावा आणि ला असता तर त्यावर विचार करण्यास या न्यायसभेस फार उत्तम साधन झालें असतें. मीं या मुकदम्याच्या सर्व मुख्य भागांवर माझे विचार सांगितले आहेत; आणि ह्मणून नरसूच्या साक्षीविषयीं आतां जास्त बोलण्यास मी इच्छित नाहीं. माझे विद्वान मित्र यांचा मुकदमा असा आहे की कोणग्राही उद्देशाबांचन, कोणमाही प्रयोजना- यांचून, कोणी क्रोधोद्दीपन केल्यावाचून, आणि वैरोद्धार करण्याच्या बुद्धीवांचून हे रेसिडेन्टाचे चाकर चांगला धनी व चांगला रोजमुरा असतां व सर्व प्रकारें करून यांची स्थिती समाधानकारक असतां कांहीएक कान झाडणी न करितां व हरकत न घेतां व अनंगीकाराविषयीं एकही शब्दाचा उच्चार न करितां प्रत्यक्ष रीतीनें सांस आपल्या धन्यास मारून टाकण्यास सांगितल्याबरोबर एकाद्या सामान्य कृत्यास नशी सहज संमती द्यावी त्याप्रमाणे अतिशय दुष्ट कर्म करण्याचें एका मागून एक प्रयत्न करण्यास सिद्ध झाले. जर ते आपल्या दुष्ट कृत्यांत विजयी झाले असते तर चोहोंक- डून संकटांनी त्यांस वेढिले असते आणि त्यांवर त्या पातकाबद्दलचा आरोप ठेविण्यां. त आला असता, आणि त्यांनीं तो दोष दुसऱ्यावर लोटावा अशी कांहीं देखील शक्यता नव्हती. याप्रमाणे या मोकदम्यासंबंधी आपल्यास नो इतिहास सांगितला तो असा आहे. महाराज, आपल्यास पहिल्याने हा सिद्धांत करणे आहे की विषप्रयोग करण्याचा प्रयत्न खरोखर झाला की काय; आपण विषप्रयोग खरोखर झाला हा सिद्धांत कराल हे शक्य आहे. कारण कीं खून करण्याचा प्रयत्नः न करतां प्रयत्न केला असे कबूल करून आपण आपल्यास संकटांत पाडून घेईल असा कोणी दुष्ट मनुष्य असेल असे आपल्याच्यानें ग्रहण करवणार नाहीं आणि या सिद्धांताच्या विरुद्ध मीं बोलावे अशी माझेपाशी साधने नाहीत; व मजपाशीं तसा पुरावाही नाही. आणि खरोखर त्या सिद्धांताचें खंडन करावें असा माझा हेतु ही नाहीं परंतु मी वारंवार सांगतों कीं, अगदी बेअब्रूच्या लोकांनी आपल्या पुढें साक्षी दिल्या आहेत. व पराकाष्ठेच्या बेअब्रूच्या लोकांनी आपल्या पुढे येऊन बाष्कळ आणि असंभाव्य गोष्टी सांगितल्या आहेत आणि पोलिसाने नि:संशय प्रत्येक प्र संग यांस फितवून आपल्या पुढे आणिले व पोलिसांकडून तसे करण्याचा अतिश य बळकट हेतू होता, त्या खेरीज महाराजांच्या विरुद्ध आपल्यापुढे कांदेखील पुरावा झाला नाहीं. कोर्टापुढे आणलेल्या साक्षीदारांनी महाराजांस अपराधी आहेत असे आपल्या मनांत भरवून दिले असता त्यांच्या आपराधाबद्दल क्षमा होईल अशी यांस वचनें दिली होतीच; आणखी यांच्या मनांवर तप्त मुद्रा मारून असा ठसा उठवून दिला होता की, महाराजांस जर यांनी अपाराधी ठरवून दिले नाहीं तर त्यांच्या गळ्यांत जी फांसाची तांत घातली आहे त्यासह यांच्या कर्माला उचीत भसें शासन भोगण्याकरितां त्यांस तुरंगांत जाणें पडेल. आतां मला असे वाटते की मी या साक्षीदारापासून माझी सुटका करून घ्यावी आणि जरूर पडेल तर कर्नल फेर मांच्या पुराव्याविषयों व्याख्या करितांना त्याजबरोबर त्यांस सामील करा