पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. णून मी लिहून घेतलें नाहीं. मी आतां कमिशनास या गोष्टींकडे त्यांनी चांगल क्ष द्यावे ह्मणून प्रार्थना करतों. जसे माझे मनांत आले आहे तसे आपल्याही मनां- त येईल की, जर नरसू यानें तोंडानें कबूल केले होते तर सूटर साहेब यांचें कर्त- ब्यकर्म होते कीं, तेथेंच आणि त्याच वेळेस त्याची जबानी लिहून घ्यावयाची होती. आणि ही कबुलायत खून करण्याच्या प्रयत्नाबद्दलच्या गुन्ह्याची होती असे असत सूटर साहेब यांनीं त्याच वेळेस कां बरें लिहून घेतली नाही ? या चौकशीच्या सं बंधानें मला दुसरे काम होते ह्मणून मी त्यावेळेस जवानी लिहून घेतली नाही असें खुनाच्या कामांतील साक्षीची जबानी घेण्यापेक्षा त्यांस असें तें कोण. ते मोठें महत्वाचे दुसरे काम करावयाचें होते ? याबद्दल सूटर साहेब यांजपाशीं कां हाँ उत्तर नाहीं. आतां आपल्यास सर लुइस पेली यांच्या संबंधानें पहावयाचे आ. ते ह्मपातात. हे, त्यांची हकीगत सूटर साहेबांहून अगदी भिन्न आहे. यांच्या सांगण्यावरून मला जें कांहीं समजले आहे त्यावरून असे दिसते की, सूटरसाहेबांस जबानी लिहून घे.. व्यास अवकाश नव्हता असें नाहीं. ते त्याची जबानी लिहून घेण्याच्या बेतांत हो- ते पण सर लुइस पेली यांस ह्मणालें कीं, “छे? नको, त्यास विचार करण्यास वेळ द्या;" आणि मग त्यास पोलिसांच्या स्वाधीन केला आणि दुसऱ्या दिवशी त्याची जबानी लिहून घेतली. तोपर्यंत तो त्यांच्याच ताब्यांत होता. येथें मला अगदी स्पष्ट सांगितलें पाहिजे की हे सगळे कृत्य अतिशयेकरून इंगित सूचक आहे: नरसू याची जवानी तात्काळ लिहून न घेतां त्यास विचार करण्याची संधी देण्याचा उद्देश हाच की त्याच्या हकीगतीशी इतर साक्षीदारांच्या हकीगतीचा मेळ नसेल, किंवा त्याच्या साक्षीत कांहीं विरोधी मजकूर असेल, त्याची दुरुस्ती व्हावी, नरसू यास तारीख २३ रोजी धरलें असतां त्याची तारीख २६ विस पर्यंत जबानी लिहून घेतली नाहीं ही गोष्ट कमिशनाने चांगली लक्षांत ठेविली पाहिजे, ही गोष्ट सर लुइस पेली यांनींच कबूल केली आहे, अतां आपण त्या बागांतील देखाव्या पर्यंत किंवा त्या कूपवृत्तापर्यंत येऊन पोहैं। चलों, याविषयीं मीं आपल्यास श्रुत केलेच आहे. नरसू यास पापा बदल अनुताप होऊन प्राण देण्यासाठी व्याने विहिरीत उडी घातली किंवा यथेष्ठ जेवला होता त्यामुळे घेरी येऊन विहिरीत पडला हा प्रश्न आहे त्या विहिरीच्या संबंधाने ज्यांनी तो बाष्कळ कथा सांगितली ते कोण असतील ते असोत पण त्यांनी सांगितलेली हकीगत ढळढळींत समजूनउमजून लबाडी आहे. ते असे ह्मणतात कीं नरसू पोलीसच्या पहात होता. तेथून तो पळाला आणि विहिरींच्या कांठावर उ. भाराहून त्यानें तीत उडी घातली. ही गोष्ट अशी तपशीलवार सांगितली आहे की ती सहन खरी करून देता आली असती, परंतु ज्यांच्या पहाण्यांतून तो निसटून गेला ते लोक कोठें आहेत?त्यापैकी एक देखील धुंडून काढवत नाही काय? या असावध पहारे- कन्यांपैकी एक देखील सांपडत नाही काय? ही गोष्ट फार चमत्कारीक आहे की माझ्या विद्वान मित्राला जो सदगृहस्थ मुकदमा समजून देत आहे, त्यांनें याबद्दल पुरावा करण्या- करितां एकाही मनुष्यास साक्षीदाराच्या पिंजप्पांत आणून उभे केलें नाहीं. नरसूनें