पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण (२७५) द्यावर त्यांनी जी इमारत रचली आहे, ती मुळापासून ढासळून टाकली पाहिजे. मीं आपल्यास पूर्वी सुचविलें आहे की, या पदार्थाला कांहीं चव नाहीं तर मग आतां मी असे विचारितों कीं, त्या गोष्टीची एकवाक्यता कशी करावी ? त्या काळ्या रं गाच्या गदळाचें झालें तरी काय ? तें कोठें गेलें ? डाक्टर ग्रे यांस तें सांपडले नाः हीं, आणि डाक्टर सिवर्ड यांसही तें सांपडलें नाहीं. त्या दोघांस तर भस्मी रंगाची मुकी सांपडली. मी अर्से सुचवून ठेवतों कीं कांहीं लोकांच्या मनांत कर्नल फेर यांस विषमयोग करण्याचा हेतू होता, परंतु रेसिडेंसींतील नौकरलोकांनी अशी काळजी ठेवि- ली होती कीं, तांब्याचा उपयोग करावा किंवा अशी वस्तु सरबतांत घालावी की तिजकडे सरबताचा घोट घेतल्या बरोबर कर्नल फेर यांचें तात्काळ लक्ष जावें, आणि असी गोष्ट सगळ्या बाजारभर प्रसिद्ध व्हावी कीं, कर्नल फेर यास विषप्रयोग केला. महाराज, नरसूच्या पुराव्याविषयी पुष्कळ बोलून आपलें अंतःकरण तिकडे आकर्षण करण्याची न रूर आहे असे मला वाटत नाहीं. तथापि कांही गोष्टी लक्षांत घेण्यासारख्या आहेत. नरसू यांस तारीख २३ रोजी पकडला आणि गजानन, अकबर अल्ली, आणि अबदुल अल्ली यांचे समक्ष रावजीशी मुकाबला केला. त्यावेळेस सूटर साहेब हजर नव्हते आणि ते नेहमींच्या सांप्रदायाप्रमाणे हजर नसावयाचेच. गजानन कबूल कारतो की मीं नरसू यांस प्रश्न केले. मेलव्हिल साहेब यांच्या प्रश्नांवरून गजानन यानें उत्तरे दिलीं. त्यांत तो साफ झ णतो कीं, मी रोसेंडेंन्सीच्या बंगल्याच्या मैदानांत नरसू जवळ बसलो होतों, आणि अकबर अल्ली आणि अबदुल अल्ली हे तेथें होते. मीं रावजीस सांगितले की, तूं नर- सू यांस दुसरे कांही बोलूं नको. इतकेंच सांगावें कीं, या मुकदम्यांतील प्रत्येक गोष्ट मीं सांगितली आहे. आणि त्यानें ही त्यापेक्षा जास्त कांही सांगितलें नाहीं. नरसूने जें काही सांगितले होते तें मीं कांहीं रावजीस सांगितले नव्हतें. महाराज, या गोष्टीतील सूक्ष्म विचार माझ्याने आपल्यास सांगू शकवत नाहीं. खरोखर जी कांही गोष्ट बनली ती निराळी असून ही सगळी कल्पीत कादबरी आहे, असे जर आपल्या मनांत ये- णार नाहीं तर मी कांही आपली खातरजमा करण्यांस समर्थ होणार नाहीं. गजानन याच्या मनांत असे होते की जेणेकरून नरसू यास सूचना होईल असे रावजी याने काही बोलू नये. परंतु रावजीनें जें कांहीं केलें तो अगदर्दी बुद्धीगम्य सूचना होती. तो असें ह्मणाला की मी यथास्थित सांगितलें; आणि यांत सर्व कांहीं आले. या प्रसंगी कदाचित गजानन याची ईच्छा चांगली असेल परंतु त्याचा स्वभाव आणि माचा पूर्वीचा इतिहास यांच्याशी त्याकृतीचा मेळ पडत नाहीं. आणखी जरी योगानें व्याचा उद्देश पवित्र असेल तरी शेवटी जें कांहीं झालें सा. त्यांचा हेतू दुःखदायक स्थितीनें निष्फळ झाला. नरसू यानें हकीकत सांगितली आणि नंतर त्यास सर लुईस पेली आणि सूटर साहेब यांजपुढें नेलें. तेथे त्यांस सांगितले कीं, तुला माफी मिळणार नाहीं. नरसू यानें तोंडची क- बुलायत दिली होती मी सूटर साहेब यांस विचारले कीं, तुझी त्याची जवानी लिहून कां घेतली नाही. त्यांनी उत्तर दिले की मला पुष्कळ काम होतें झ