पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. तत्व शोधनार्थ पाठविली होती त्याविषयींचा आपल्यास विचार करावयाचा आहे. तिच्या रंगाविषयों आपल्यास कोणी खुलासा सागितला नाहीं. कर्नल फेर यांच्या नें व डाक्टर सीवर्ड यांच्याने त्याविषयीं खुलासा सांगविला नाहीं. ती तशीच विवरणा- शक्य स्थितीत आहे. आणखी दुसरी एक गोष्ट आहे त्यावरून असे दिसतें की जी खरी मुकी ती ही नाहीं. जर खरोखर सोमलाचाच उपयोग केला होता, तर सोमल अगदीं निचव आहे. कर्नल फेर म्हणतात कीं, मी सरबत प्यालों तेव्हां मला अति- राम कळकट चव लागली आणि पुराव्यावरून आणि तत्ववेत्याच्या साक्षीवरून तर असें कांहीं दिसत नाहीं कीं, त्या सरबताची कळकट चव लागावी असा कांहीं प- दार्थ त्या सरबतांत सांपडला आहे. तर कर्नल फेर यांस कळकट चव कां लागली याविषयीं कांहीं खुलासा कळला नाहीं. आणि ही गोष्टही तशीच अगदीं अस्पष्ठी- कृत राहिली आहे, पण माझे मित्र मला असा प्रश्न विचारतील कीं, डाक्टर सीवर्ड आणि डाक्टर ग्रे यांच्या ताब्यांत सोमल निघाला त्याविषयों तुझी काय ह्मणाल ? तर त्याचें मी उत्तर द्यावे किंवा नाहीं, हें कांहीं मला कळत नाहीं. मी उत्तर द्यावें अशी जर अपेक्षा केली तर मी बेलाशक असें झणतों कीं, तसे करण्याची या ज गांत तिळमात्र देखील अडचण झणून नाहीं. डाक्टर सीर्क्स आणि कर्नल फेर यांचें अंतःकरण या विषप्रयोगाच्या खटल्याकडेस पूर्णपणे लागले होते, त्यांनीं त्यांत काहीं फेरबदल केली असेल असे कदाचित मानूं नये. पण या मुकदम्यांत आरंभापासून शेवटपर्यत अशी कोणती गोष्ट आहे की ती संभवनीय किंवा असंभवनीय नाही.* कर्नल फेर यांस खाजगी आणि विश्वासाची बातमी मिळाली होती की त्यांच्या प्याल्यांती- ल अंगभूत पदार्थ सोमल, तांबें, आणि हिऱ्याची मुकी हे होते हे आपल्या ध्यानांत असेलच. जरी कर्नल फेर यांनीं कबूल करण्यांत पुष्कळ आढेवेढे घेतले, तरी सर- 'तेशेवटों ती विश्वासाची बातमी भाऊ पुणेकर यांजपासून मिळाली आहे असें नि. ष्पन्न झालें. प्याल्यांत ताबें होतें, ही बातमी जर खरी आहे, आणि कर्नल फेर आ. •पल्या जिव्हेस कळकट चव आली होती, असें ह्मणून त्या गोष्टीस बळकटी आण. ताल तर हिऱ्याची भुकी आणि सोमल या खेरीज दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा उपयो ग केला नाही, याचें स्पष्टीकरण कसें होतें ? जर माझे विद्वान मित्र असे दाखवि ण्यास इच्छित असतील कीं दुसऱ्या कांहीं पदार्थांचा उपयोग केला होता, तर विष. प्रयोग करण्यांत फक्त सोमल आणि हिऱ्याध्या भुकीचा उपयोग केला होता, या मु. • “ Then my learned friend may say, how do you account for the arsenic getting into the possession of Dr. Seward, or Dr. Grey? I do not know whether I should answer that, but if it is intended that I should, I take the liberty of saying, that there would not be the slightest difficulty of doing so in the world. It is perhaps not to be supposed that either Dr. Seward or Colonel Phayre, who had their attention direct- ed so much to this matter of poisoning might have made a change; but what is there from the beginning to the end of this case that is not either probable or improbable ? - Nothing." (Baroda Blue Book No. 7. Page 108.