पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सॉरजंट बालंटाईनचे भाषण. (२७३ ) असंभवनीय नसून अशक्यही नाहीं. परंतु कर्नल फेर यांस मारून टाकण्यांत म हाराजांचें कोणत्याही प्रकाराचें हित मव्हतें, दामोदरपंत याचें मात्र हित होते असें मी आपल्यास उपपत्तिपूर्वक निवेदन केले आहेच. परंतु रेसिडेंटच्या चाकरांच्या सं- बंधानें विचार करिता कर्नल फेर यांचा प्राणघात करण्यात मूलोकसंबंधी त्यास कोणता अर्थ साधावयाचा होता है शोधून काढणें पराकाष्ठेचे कठीण आहे. कर्नल फेरवि षयीं त्या लोकांचें कांहीं गान्हाणे नव्हतें, व त्यापासून त्यांस जे कांहीं मिळण्यास योग्य होतें, तें मिळाळें होतें. त्यांत नरसू यानें तर फार वर्षेपर्यंत रेसिडेन्सीची जा. करी केली होती. कर्नल फेर यांस मारून टाकून त्यांनी आपला एक मायाळू धनी मात्र गमाविला असतां. भाऊ पुणेकर यासारखे फार सोदे आणि शहाणे असें कांहीं दुसरे लोक आहेत त्यांनी कर्नल फेर यांजवर पूर्णपणे आपला पगडा बसविला होता; त्यांचे मन वश करून घेतलेले होतें, व त्यांच्या बुद्धीचे आपण चाळक होऊन बसले होते. गायकवाडांच्या दरबारांत काय चाललें होतें तें त्यांस माहीत होते. आणि त्यांत त्या खळित्याविषयीं त्यांस पूर्णपणे माहिती असून कर्नल फेर यांस बडोद्याच्या द- रबारांतून काढण्यात येईल अशा स्थितीस ते येऊन पोहोचले होते हेही त्यांस माहॉ- त असेल. आतां जेथें घडून आलेल्या गोष्ठींचा प्रत्येक माग सृष्टीक्रमबाह्य आ णि असंभवनीय आहे तेथें जर आपण असा सिद्धांत केला कीं विषप्रयो गाच्या प्रयत्नाचा उगीच देखावा दाखविला असता कर्नल फेर बडोद्याच्या दरबारांतून निरसन मयापासून मुक्त होतील असे भाऊ पुणेकर यांचे मनांत सहज आले असेज, तर हा आपला सिद्धांत कोणी जुलूम करून आपल्यापासून करविला असे होणार नाहीं. लहान वस्तु मोठ्या वस्तूंत गर्क होऊन जाते हैं स्वाभाविक आहे. आणि कर्नल फेर यांस विषप्रयो- ग केल्याच्या बातमीपासून त्यांस बडोद्यांतून काढण्याचा विचार रहित झाला असता यांत संशय नाहीं. रावजी याच्या साक्षीत तशी गोष्ट नाही, म्हणून माझ्याने निश्चय पूर्वक याविषयीं कोटीस कांहीं सांगवत नाहीं. रावजीच्या पुराव्यावर भरंवसा ठेविला तर तो ती कुपी घेतो, आणि प्राणघातक ह्मणून तिच्यांतील विष फेंकून देतो. नंतर त्या दोन पुड्या घेतो. आणि त्यांपैकी एक प्राणनाशक म्हणून तिचा उपयोग क रीत नाही, आणि जी निरुपद्रवी तिचा उपयोग करतो. रावजीने जर त्या निरुपद्रवी मुकीचाच उपयोग केला असेल तर हें खचीत आहे कीं, कर्नल फेर यांस कांहीं उपद्रव होऊं नये ही गोष्ट रावजीने चांगली ध्यानांत धरली होती. आता आपल्यास त्या काळ्या रंगाच्या भुकीविषषीं विचार करावयाचा आहे. ह्या मुकद- म्यांत ती एक अतीशय विलक्षण जातीची भुकी आहे. रावजी तिला काळी अथवा काळसर असे ह्मणतो. कर्नल फेर तिला काळी ह्मणतात, आणि डाक्टर सीवर्ड साहेब तिला घेऊन जाऊन ती भस्मी किंवा करड्या रंगाची होती असें ह्मणतात. त्यांच्या तोंडचे शब्द असे आहेत की, “माझ्याने ती मुकी काळी होती असें झणवत नाही. कारण की, जी भुकी मी नेली ती भस्मी रंगाची होती, "यास्तव जी मुकी ३२