पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. जेव्हां मी कर्नल फेर यांची जबामी वाचीन तेव्हां अपल्यास कळून येईल की, जें कांही त्यांस केले होते त्यापूर्वी फार भगोदर त्यांस हळूहळू विषप्रयोग करण्यांत येत होता, असे आपल्या मनात ते भरवून देत आहेत. कर्नल फेर यांच्या कपाळावर एक गळं झाले होते त्यावेळेस त्यांस झालेल्या भावना रावजीत मिळालेल्या विषाच्या कु- पीपासून झाल्या असे ते आतां ह्मणतात. परंतु रावजीनें तर त्या कुपीचा कांही उप- योगच केला नव्हता. त्यांस गळवास लावलेल्या पट्टीपासून जी ईजा झाली व त्यांच्या मगजांत जो घोटाळा झाला, तो रावजीने त्या पट्टीत कांहीं विष टाकले त्यागसून झाला असे ह्मणण्यांत आले आहे; परंतु रावजीने या कुपितील द्रव्य फेंकून दिले हो- .ते. आणि त्याचा कांहीं उपयोग तर केला नव्हता मग कर्नल फेर यांस विषाच्या भा बना झाल्या कशा ? असे लटले आहे की नरसू याने त्या कुपीविषयों रावनीस विचारले आणि त्याने तिचा उपयोग केला असे सांगितले. पण त्या कुपीचा सर्व वृत्तान्त आपणास समजला आहे, आणि ह्मणून या लबाडीबद्दल मी काही जास्त बोलण्यास इच्छित नाही. तारिख ५ नोवेंबरच्या सुमारास रावजी आणि नरसू मह राजांकडे गेले होते. तेव्हां महाराजांनी रावनीस त्याने काही केले नाही ह्मणून सक्त ठपका दिला आणि एक जचर रानटी शिवी दिली असे सांगण्यांस आले आहे. मी या न्यायासभेत जे राजे आहेत त्यांस विचारतों की प्राच्य देशांतील रितीभातिविषयीं अःणि महाराजांसारख्या उंच पदवीच्या मनुष्याच्या चालचलवणुकी- विषयीं त्यांस जी माहिती आहे त्यावरून महराजांच्या मुखांतून अशी रानवट शिवी निघाली असेल असे त्यांस वाटतें कां ? नंतर रावजी असे ह्मणतो की, नरसू यानें दुसरे दिवशीं मला काळा किंवा का- ळसर रंगाचा पदार्थ दिला; (कर्नल फेर याच्या सरबतांत पदार्थ काळा ह्मणून ह्मणतात तो हा.) आतां येथे एक गोष्ट लक्षांत ठेवण्या जोगी आहे. दामोदरपंत या नपासून उपस्थित झालेले प्रत्येक कार्य सालम किंवा येशवंतराव याच्या द्वाराने शेवट पर्यंत पोहचत होते असं असतां वेळोवेळी त्या विषाच्या पुड्या नरसू यासच कां देण्यांत आल्या ते मला समजत नाहीं. असो नरसूने रावजीस पुडी दिली आणि तिचा त्याने उपयोग केला किंवा नाही याबद्दल त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा किंवा नाहीं याच्या निर्णयावर अवलंबून राहिले आहे. आतां कमिशनासमोर असा पुरावा आहे की, दामोदरपंत यांच्या कबूटीवरून त्याने ही सगळी रचना केली आणि सालम व यशवंत राव यांच्या द्वारानें भुक्या नरसूच्या हवाली केल्या. आणि त्याने रावजीच्या स्वाधी- न केल्या. परंतु या गोष्टींत महाराजांचे अंग होते असे नुसत्या तोंडच्या सांगण्या- खेरीज दुसरें कांहीं देखील प्रमाण नाहीं. आणि ह्मणून मी छातीस हात लावून असें ह्मणतो की, महाराजांवर आणलेला चार्ज कोणत्याही प्रकारे शाचीत करवला नाहीं. दामोदरपंत यांस आपण केलेल्या पापाबद्दल रेसिडेंट यांचें भय होते आणि त्यप्रा. सून आपली सुटका करून घेण्यासाठी शवजी व नरसू यांन आपल्या साह्यास घेऊ न त्याने कर्नल फेर यांचा प्राणनाश करण्याचा प्रयत्न केला होता, असे मानणे अ