पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स.रजंट बालंटाईनचें माषण. (२७१) वचन अतिशय दुःसंभाव्य होय. आतां नरसूच्या संबंधानें पहाता त्याने आरंभापासून शेवटपर्यंत असे कोठेही सांगितले नाहीं की, ज्या पातकाबद्दल त्यानें शेवटी मोठा अनुताप दाखविला आहे त्या पातकांत सामील होण्याविषयीं त्याचे मन वळवितांना त्यास कांहीं देण्याचे कबूल केले होते. ह्या मुकदम्यांत असंभाव्य गोष्टींचा इतका जथा जमला आहे की एकीचे दुसरी बरोबर आणि दुसरीचें तिसरी घरोबर असे परंपरेने साम्य करूं जातां एकी पेक्षां एक अधीकाधीक वरचढ दिसते. एकाच कामांत दामोदरपंत आणि रावनी हे दोघे अत्यंत लिप्त झाले होते असे मानले तर रावजी यांनी दामोदरपंताविषयों जी हकीगत सांगितली आहे ती फार विलक्षण आहे. तो ह्मणतो " दामोदरपंत नांवाचा मनुष्य मी जाणतों. मी त्यास पाहिल्याने आळखतो. तो महाराजांबरोबर नसवरीस होता." दामोदरपंताविषयों रावजी ने सांगतो तें हैं, दामोदरपंत यांनी रावजीविषयों काय सांगितले ते आपल्या ध्यानांत असेल. "एके दिवशी रावजी माझे बिऱ्हाडी आला होता. त्याने रेसिडेन्सींतून कांहीं दस्तऐवज चो- रले होते आणि त्याच्या मी नकला करून घेतल्या तोपर्यंत तो थांबला होता." हें दामोदरपंत पार्चे सांगणे. यावरून असे दिसून येतें की गजानन विठ्ठल, अकवर अल्ली भाणि अबदुल अल्ली हे तीन गृहस्थ पुरावा तयार करीत होते. आणि प्रत्ये- काने आपल्या विचाराप्रमाणे निरनिराळ्या रीतीने पुरावा तयार केल्यामुळे दोघांच्या सांगण्यांत तफावत पडला आहे. द्वैध हे सत्याचे प्रमाण आहे असे कोणी ह्मणोत. पण ते एक लबाडीचें प्रमाण आहे. स्वल्प द्वैध हे सत्याचे प्रमाण दर्शक होईल पण प्रत्येक मुख्य मुद्याच्या गोष्टीविषयीं साक्षीदारांच्या सांगण्यात पराकाष्ठेचा तफावत पडणें हें लबाडीचे द्योतक आहे. असो, आतां याबद्दल विस्तारपूर्वक सांगून भी कोर्टा- रावजी त्या पुड्याविषयीं असे सांगतो कीं एका पुर्डी- त पांढरी आणि दुसऱ्या पुडीत गुलाबी अशा दोन रंगांच्या भुक्या होत्या. मी गुला- बी रंगाच्या सगळ्या भुकीचे समान तीन माग केले आणि त्या पांढऱ्या भुको पैकी थोडें थोडें घालून बाकींची पट्यांत ठेविली आणि त्या तीन पुड्या निरनिराळ्या वेळी पेल्यांत घातल्या. या विषयाच्या संबंधानें आतां मला कर्नल फेर यांच्या पुराव्याविषयी विचार केला पाहिजे. ते असें ह्मगतात की मढा घेरी येत होती आणि माझे मलाच विस्मरण पडत होतें; आणि जरी त्या भुक्यांचा उपयोग कर्नल फेर पू र्णपणे चांगले झाल्यावर करण्यांत आला होता तरी त्यांनी आपल्यास झालेल्या भावना त्या भुक्याकडे लावल्या. भुक्या तारीख ९ नोवेंबर पूर्वी पंधरा वीस दिवस अगोदर मि. ळाल्या होत्या. आणि ज्या भावनाविषयों मीं सांगितले आहे त्या जेव्हां त्यांच्या क. पाळवर गळं झालें होतें तेव्हां झाल्या होत्या असा काल निर्णय केला आहे. अमुक एक गोष्ट घडली असे आपणास कळाल्यावर त्या गोष्टीशी मेळ जमेल अशा भावना आपल्यास पूर्वी झाल्या होत्या व आपल्यास असा भास होत होता असे दाखविण्या- चा प्रयत्न करणे फार विलक्षण आहे. मला या प्रयत्नास कपटाचा प्रयत्न असें ह्मणा। वयाचें नाहीं; पण असे प्रयत्न ज्याचें मन असंस्कृत असते त्याच्यापासून होतात. चा वेळ घालवीत नाही.