पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ला नाही. आणि त्यावरून मला असे दिसतें की विषप्रयोगाच्या खटल्यांत महाराजांचें अंग असल्याविषयों जो आरोप आणिला आहे तो अगदर्दी अयशस्कर लबाडी आहे असें चांगले स्पष्टीकरण होते. विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला त्यापूर्वी थोडे दिवस रावजी आणि नरसू राजवड्यांत गेले होते असें सांगण्यात आले आहे, आणि या गोष्टीस बळकटी आणण्याकरितां माझे विद्वान मित्र यांनी काभाई यांस कोर्टापुढे आणिला होता. परंतु काभाई तर असें सांगतो की शेवटच्या उष्णकाळांत भी गेलों होतों. त्याच प्रमाणे जगा याच्याही सांगण्यात आहे. ज्या मुव्याचें पुष्टीकरण करण्याकरितां हे दोन साक्षीदार कोर्टासमोर आणले होते त्या मुद्याचें त्यांच्या साक्षीनें अगदी पुष्टीकरण झालें नाहीं. विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस रावजी किंवा नरसू महाराजांस भेटण्यास गेले होते असा कांहीं अदूषित पुरावा नाहीं. रावजी आणि नरसू यांच्या पुराव्यांवरून यथार्थ अनुमान असे होतें की वर्षाच्या आरं- भीं जेव्हां कमिशन बसले होते तेव्हां, आणि त्यानंतर उष्णकाळच्या ऋतूपर्यंत रावजी अ.णि नरसूच्या काही भेटी झाल्या असतील आणि त्यावेळेस त्यांस कांहीं पैका मिळाला असेल. पण त्यानंतर त्यांस एक कवडी देखील महाराजाच्या खजिन्यांतून मिळाली नाहीं. व तसे सांगण्यांतही आलें नाहीं. विषप्रयोगाच्या आणलेल्या आरोपांत ते लोक आपले जीवित धोक्यांत घालीत असतांना त्याबद्दल त्यांनी काही पैका मागितला होता असें दिसून येत नाहीं. असे सांगण्यांत आले आहे की, एका प्रसंगी नरसू यांस आठशें रुपये मिळाले होते. कदाचित ती गोष्ट खरी असेल आणि मी त्याविषयीं वाद क रीत नाही. परंतु तो ह्मणतो कीं, हो रकम मला महाराजांच्या लग्नाबद्दल लग्नाच्या वेळी देणगी लणून मिळाली आहे आणि खरोखर तिचा विषप्रयोगाशीं कांहीं इला- खा नाहीं. ज्या वेळेस ती मिळाली त्या काळाशी विषप्रयोगाच्या प्रयत्नाच्या का- ळाचाही काही संबंध जुळत नाही. माझ्या मनांत जे कांहीं विचार आले आहेत से कमिशनच्याही ध्यानांत आले असतील सबब त्याविषयों मी फार गीतगात बसत नाहीं. पण येवढेंच सुचवून ठेवितों कीं, मनुष्य जें कांहीं करतो त्याच्या प्रमाणानें तो का. भाची इच्छा करीत असतो, हा एक सामान्य नियम आहे. आणि रावजी व नरसू महाराजांस बातमी पोहोचवीत होते असे मानले आहे आणि एकास पांचशे दुसन्यास आठशे रुपये अशा प्रसंगी मिळतात की कदाचित् ते त्यांस बक्षीस ह्मणून मिळाले असते तर त्यांत कांहीं भयोग्य झाले नसतें. पण लक्षांत घे ण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की रेसिडेन्ट यांस विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रसंगी त्यांस एक काडीदेखील मिळाली नाहीं. असे सांगण्यांत आले आहे की प्रत्येकानें एक लक्ष रुपये प्राप्ती होईल अशी आशा केली होती. परंतु मला असे वाटत नाही की आपण कृतकार्य झालो असतां ती रकम आपणास मिळेल अस त्यांनी भरवसा ठेवला होता हैं कोणी खरें मानील. या देशांतील विलक्षण प्रकारच्या भोळ्या मनाच्या मनुष्याखेरीज फक्त वचनावर विश्वास ठेवून असें भयंकर कार्य कर- ण्याचा कोणी पतकर घेईल हें कांहीं कबूल करवत नाहीं. आणि सर्व प्रसंगी असे