पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. (२६९) याची आहे, त्याविषयौँ टीका करणे हे सर्वदां असंतोषकारक आहे, हे मला माहीत आहे, परंतु ह्या गोष्टीविषयों खूप विचार केल्यावरून मला असे वाटतें कीं, या कामांत सूटर साहेब यांजवर मोठी जबाबदारी आहे. गजानन विठ्ठल याची चाल त्यांस माहीत होती. साक्षीदार लोकांस त्याच्या हवाली केल्याने तो त्यांची काय दु र्दशा करील हे त्यांस माहित होते. पोलिसांनी साक्षीदारांस भय घातल्यापूर्वी आणि यातना दिल्यापूर्वी सूटर साहेब यांनी साक्षीदारांच्या जवान्या लिहून घ्यावयाच्या हो- त्या. रावजीची पहिली जबानी तारीख २३ रेजीं, दुसरी जवानी तारीख २४ रोजी, आणि तिसरी जबानो तारीख २५ रोजी घेतली. नंतर त्यास सर लुईस पेली यांच्या समोर नेले. आणि मग त्यास माफीचे सर्टिफिकीट दिलें. ही गोष्ट अतिशय चम त्कारीक आहे की, दामोदरपंत हा या कल्पित पातकाचा मुख्य उत्पादक आणि रावजी हा त्यांत पातकाची संसिद्धी करणारा असतां त्या दोघांस अपराधाची माफी आणि त्या विचाऱ्या नरसूने या सगळ्या कृत्यांत फारच थोडा वाटा घेतला असतां त्यास माफी देण्यांची नाकबुची. खरोखर या मुकदम्यांत माफी द्यावयाची तर नरतू ग्रासच दिली पाहिजे होती. परंतु सर लुईस पेली यांच्या ध्यानास त्यास माफी देऊ नये असे कां आलें असेल ते असो. असो. आतां मला रावजीच्या पुराव्याविषयी विचार कर्तव्य आहे. सरकारतर्फे असे क ळावेलें आहे कीं रावजीची पहिली भेटसन १८७३ च्या आगष्ट महिन्यांत झाली. रोसडें. न्सींत काय चालतें त्याविषयींची बातमी मिळविण्याकरितां रोसेडेंन्सीतील चाकरांस अनुकूल करून घ्यावें अशी त्या वेळेस सालम इच्छा करीत होता; इतकाच इशारा करण्यांत आला आहे. आणि जर रावजीवर भरंवसा ठेवला तर त्यावेळेस त्यानें कोही बातमी दिली होती. रावजी तीन वेळां महाराजांस भेटला. ह्या त्यांच्या भेटी कमिशनचे काम चालू असतां व तें कमिशन संपलें तो पर्यंतच्या का ळांत झाल्या. त्यांत जे भाषण झालें तें बातमीच्या संबंधाने होते. त्यानंतर रावजीने लग्न केलें. आणि याला असे वाटले की त्याबद्दल कांहीं बक्षीस मागावें. त्यावेळेस किंवा त्या सुमारास त्यास काही पैका मिळाला. तारतम्याने पाहिले असतां ही रकम इतकी अल्प होती की, तिचा कोणत्याही रीतीनें विषप्रयोगाकडे संबंध लावितां येत नाहीं. पण तिच्याविषयी मोठ्या श्रमाने चर्चा केली आहे, आणि त्याची पुष्टी करण्यासाठी रावजीने ज्या सोनाराकडून दागिने घडविले त्यास साक्षीकरितां कोर्टापुढे आणले होते. यशवंतराव याजकडून रावजीस जी रकम मिळाली ती पांचशे रुपयांची होती. त्यास काय ती येवढीच रकम दिली असे आपल्या श्रवणारूढ झाले आहे; आणि हा मुद्दा फार महत्वाचा असून लक्षांत ठेवण्या जोगा आहे कीं, विषप्रयोग झाल्यानंतर महाराजांजवळ पैका मागण्यास रावजी आणि नरसू यांस पुष्कळ संधी होती; परंतु त्याबद्दल त्यांनी कांहीं मागणे केले होते किंवा कोणत्याही प्रकारें पैशाच्या संबंधाने त्यांचें महाराजांशी दळण वळण झाले होतें असे कांहींच दिसत नाहीं. ही फारच लोक गोष्ट आहे की त्यांनी महाराजांपासून पैका उपटण्याचा कांहींच प्रयत्न के