पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुन्या राज्य पद्धतीचें वर्णन व त्यांत पुढे फेरबदल (३३) तरी त्यांचा उर्जित काळ येईल, परंतु थोडेच दिवस लोटले नाहीत तोंच लोकांनी त्यांस महाराजांचें परम कृपापात्र पाहिले. मल्हारराव महाराज यांस राज्याधिकार प्राप्त झाला त्या पूर्वी राज्यव्यवस्था कशी होती, याबद्दल निरूपण करितांना खंडेराव महाराजांच्या सद्गुणांचे वर्णन केल्यामुळे बरेंच विषयांतर झालेसे दिसतें, परंतु ते प्रसंगास अनुसरूनच आहे. बडोद्याच्या दरबारामध्ये खंडेराव महाराज यांच्या कारकीर्दीत मुख्य मुख्य अधिकारावर खाली लिहिलेले लोक होते. १. अतिंग दिवाण, निंबाजीराव ढवळे, सेनापतित्वही यांजकडेसच होतें, १. फडणीस, माधवराव रामचंद्र. १. महालानीहाय सरसुभे [ रोरोव्हेन्यू कमिशनर], हरीबा दादा गायकवाड. १. तीन हजार तैनातीस्वारांचे सुभे, गंगाजीराव खानवेलकर. १. फौजदारीचे मुख्य अधिकारी पूर्वी भाऊ शिंदे होते, परंतु ते दिवाण झाल्यावर त्यांचा एक आप्त चंद्रराव म्हणून होता तो नावाचा अधिकारी असे. सर्व काम कोणी तरी कामदार पहात होता. मल्हारराव महाराज राज्याचे अधिकारी झाले, तेव्हां रघुनाय रामचंद्र महालानीहाय सरसुभे यांचे कामदार काम पहात होते. न्यायाधीश बळवंतराव सदाशिव. १. डेप्युटी सरसुभे, नारायण भाई ललुभाई. १. सदर न्यायाधिशीचे कामदार, माधवलाल गंगाधर, सखाराम बल्लाळ रानडे, व आबा शास्त्री ओतीव. १. महालानीहाय सर न्यायाधीश, कृष्णराव मल्हार ऊर्फ अण्णा पानशे. १. नाझर, चिमणराव रघुनाथ. १. हुजूर कामदार, भिकाजी गोपाळ रोडे. रेसिडेंटाकडून दरबारांत यादी येत त्यांचे जबाब वेळेवर गेले किंवा नाही याची चौकशी ठेविणे हे या कामदाराचे काम. अधिकारी लोकांची वर जी नामावली दिली आहे, त्यांत मुंबईच्या पाठ- शालांतून पदवी मिळविलेला विद्वान म्हणविणारा असा एकही मनुष्य नव्हता. निंबाजी राव ढवळे, हरीबा दादा गायकवाड, गंगाजीराव खानवेलकर, आणि चंद्रराव शिंदे, हे तर त्यांजकडे अधिकार सोपल्या नंतर आपली सही करण्यास शिकले. यांत अतिशयोक्ति आहे असे कोणास वाटत असेल तर त्यांच्या सह्यांचीं मोत्याच्या दाण्यासारखी अक्षरे कोणी काढून पहावी म्हणजे त्याची खात्री होईल. अशा लोकांच्या हातीं मोठमोठ्या हुद्याचीं कामे असल्यापासून तो कोणता चांगला परिणाम होऊन राष्ट्राचे हित व्हावयाचे होतें, ही गोष्ट खरी आहे, परंतु त्यांच्या हाताखालचे कामदार व दुसरे कामदार आपआपली कामे