पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )
उपोद्घात.



तुम्ही अशा उदासीन अवस्थेत काल क्रमिता त्यापेक्षां कांहीं उद्योग कां करीत नाहीं ? या सद्गृहस्थांस माझी पैशासंबंधी स्थिति माहित होती सबब त्यांनी मला सावकाराचे दुकान काढावें, एखादी नवी गिरणी उभी करावी आणि व्यापार रोजगार करावा असा इतर गैरमाहित लोकांप्रमाणे उपदेश केला नाहीं. मजजवळ पुष्कळ द्रव्य आहे, आणि गायकवाडांचे मी भांडार लुटून आणिले आहे, अशी समजूत आज देखील पुष्कळ लोकांची आहे, आणि माझ्या विपत्तीचें मूळबीज कायतें हेंच आहे. अस्तु. त्या सद्- गृहस्थांनी मला असा उपदेश केला की, बडोद्याच्या दरबारांत गणपतराव महाराज यांच्या कारकीर्दीपासून तुम्हीं पुष्कळ वर्षे काम केले आहे व त्या राष्ट्राची तुम्हास वाकबगारी ' आहे, यास्तव तुम्ही त्या राष्ट्राचा इतिहास लिहा, तेर्णेकरून तुमच्या मनाला व्यायाम होईल, विश्रांति मिळेल, आणि ज्या राष्ट्राचे तुम्हीं पुष्कळ वर्षे अन्न खाल्ले आहे त्या राष्ट्राची रिकामपणांत देखील कांहीं तरी सेवा बनावली असे होईल.
 हा त्यांचा उपदेश माझे मनांत ठसला. गायकवाडांच्या राजघराण्याचा समग्र इतिहास लिहावा असे माझ्या मनांत आले, परंतु त्या बद्दलची साधने मला अनुकूळ नसल्यामुळे तो विचार सोडून देऊन श्रीमंत मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीचा इतिहास लिहिण्यास आरंभ केला, पण त्यासंबंधी माझ्या स्वतःच्या माहितीखेरीज दुसरी माहिती इंग्रजी भाषेच्या पुस्तकांत असल्यामुळे हातीं घेतलेले काम मला परम दुर्घट वाटले, परंतु पुण्यास आल्यावर मी इंग्रजी भाषेचे परिज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला होता त्याचा थोडा थोडा उपयोग होऊं लागला आणि जसा तसा हा इतिहास एकदाचा माझे हाते शेवटास गेला. वाल्या कोळी यास नारदानी 'राम राम' या मंत्राचा व्यस्ताक्षराने उपदेश केल्यामुळे तो जसा कृतार्थ झाला तद्वत त्या सद्गृहस्थांच्या अनुग्रहाने कार्याच्या महत्वाप्रमाणे माझ्याही मनाला बरीच विश्रांति झाली. मी ग्रंथ लिहीत असतां माझ्या परम मित्रांपैकी एकाने मला पत्रांत 'आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः हा श्लोकाचा चरण लिहून पाठविला होता व त्याजकडे माझे लक्ष असावे अशी सूचना केली होती, ती माझे मनावर अगदीं कोरून ठेविली होती. जेव्हां मला इंग्रजी भाषेच्या स्वल्पज्ञानामुळे हें काम माझे हातून शेवटास नात नाहीं असें वाटत असे तेव्हां मला त्या श्लोकाच्या चरणाची आणि माझ्या मित्राच्या सूचनेची आठवण होऊन अपुरतेच काम टाकून देण्यास लज्या उत्पन्न होत असे.
 तुमच्या मनाला बरीच विश्रांति झाली असेल पण ह्या ग्रंथाचा लोकांस उपयोग काय व ज्या राष्ट्राच्या एका राजाच्या कारकीर्दीचा हा इतिहास आहे त्या राष्ट्रास त्यापासून फायदा कोणता असा मला कोणीही प्रश्न विग्वारील तर त्याबद्दल मला उत्तर दिले पाहिजे.<br.  इतिहासाचे महत्व सर्वमान्य असून त्याचे सरहस्य परिज्ञान फारच हितकारक आणि सन्मार्गदर्शक आहे. त्याचा अभ्यास करतांना त्यांतील कोणती रहस्ये जाणून घेण्यास योग्य आहेत याचा मात्र सूक्ष्म विचार करून तो मोठ्या चातुर्याने निवडून घेतली पाहिजेत. प्राचीन काळी धार्मिक, पराक्रमी, व उदार; दुष्ट, पौरुषहीन, आणि कृपण राजे झाले. त्यांचे जन्मकाळ आणि मरणकाळ व तशाच प्रकारच्या त्यांच्या कारकीर्दीतील