पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास लबाडीकडे कमिशनचें लक्ष पोहचवून आजचें माझें भाषण मी संपवितों, पेद्र हा निः संशय अब्रूदार साक्षीदार आहे. त्याच्या अब्रूला कांहीं काळीमा लागी नाहीं तो पोर्टगीज आहे आणि मला असे कळविण्यांत आले आहे की, हिंदू पेर्टिगीजाच आपल्या दुष्कर्माचा साझकारी कधीं करणार नाही. ज्या ठिकाणी त्यास कोणीं फि. तवूं शकला नाही या ठिकाणी यांनी एका सद्गृहस्थापुढे आपली जवानी दिली आहे. ज्याने आपल्या धन्याची २५ वर्षे नौकरी केली तो कोणत्याही उद्देशापा- सून आपल्या धन्याचा प्राणघात करण्याकरितां विषाचा स्विकार करील किंवा नाही याचा निर्णय माझे बोलणे ऐकिल्यावांचून देखील कमिशनास करितां येईल. पेट्रू पार्ने विश्वासघात करण्याचे कोणत्या हेतूनें कबूल केले होते हें कांही या मोकद- म्यांत कोठें सांगितलेले मला आढळत नाहीं. अठरावा दिवस मंगळवार तारीख १६. णण्यास विषप्रयोगच्या कल्पित प्रयत्नाची कर्नल फेर यांनी प्रथमारंभी चौकशी केली त्यावि- षयों मीं थोडीशी हकीगत सांगितली असतां या मोकदम्याचा निर्णय करण्यास क मिशनास कांहीं सहाय मिळेल असे मला वाटते. त्यावेळेस सत्रजी आणि नरसू यांनी जो पुरावा दिला आहे याविषयी विशेष टिका करून सांगितल्याने त्यांच्या मुखास लागलेल्या काळिमेला कांही ज्यास्त रंग चढतो असे नाही, परंतु ती गोष्ट अशी क्षुल्लक नाही की तिजकडे लक्ष दिल्यावांचून तशीच राहू द्यावी. विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाल्याविषयी संशय उत्पन्न झाल्यावर रेसिडेन्सीतील सर्व चाकरलोकांस असे भय वाटले की आपल्या पैकी कोणावर तरी आरोप येईल. तेव्हा यांनी संगनमत करून जो अगदी निरुपद्रवी मनुष्य ( फेजुरमजान ) होता त्याजवर आरोप ठेविला की, विषप्रयोगाचा प्रयत्न त्याने केला. तसे करतांना मांस कांहीं देखील लाज वाटली होती असे दिसत नाहीं. जीं मनुष्यें ( रावजी आणि नरसू ) आपल्यापुढे येऊन आ- पण अपराधी आहोत असे कबूल करतात तेच प्रत्येक मनुष्यावर आरोप एका पायावर उभे होते, आणि त्यांनी महारानांवर आतां आरोप ठेविला आहे. याप्रमाणे या मुकदस्यांतील सगळा पुरावा आहे. न्यायाधीशांनी भरवंसा ठेवावा असा एकही पुरावा नाहीं. आतां रावजीच्या पुराव्याविषयी मला जे काही सांगावयाचे उर् लें आहे याजकडे मी वळतो. पोलिसांच्या वर्तणुकीविषयीं मीं सांगून ठेविलेच आहे. आतां रावजीच्या संबंधानें त्यांनी काय केले तें सांगतो. रावजी यांस तारीख २२ रोजी पाहात ठेविलें, आणि असें ह्मटलें आहे की त्याच दिवशी संध्याकाळी त्याने कबूल केले क्रीं, मीं सरबतांत विष कालविलें. तो जर कबूल करील तर त्यास माफी मिळेल असे वचन दिले होतें. परंतु ही गोष्ट देखील अकबर अल्लीचें त्याजवरोबर भाषण झाल्यावर घ डली. मूटर साहेब यांनी कामास लाविलेले अकबर अली आणि दुसरे यांनी रावजी ग्रांस वठणीत आणल्यावर सर लुइस पेली यांजपुढे नेलें. अकबर अल्ली, गजानन विठ्ठल आणि अबदुल अल्ली यांनी अगोदर साक्षीदारांस पढऊन मग सूटर साहेब यां- जपुढे न्यावे हा आपला नेमलेला क्रमच होता. जी गोष्ट गैरवाजवी आणि अन्याः