पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. (२६७) केला असतां आपल्यास असे कळून येईल की, या मोकदम्यांत असंगतपणाचा एक मोठा समुदाय जमला आहे आणि त्यांतून सत्य शोधून काढणें परम दुर्घट आहे. तथापि पट्टयांतून जो सोमळ निघाला तो सत्य शोधून काढण्यासाठी फार उप- योगाचा आहे यांत कांहीं भ्रांती नाहीं. दामोदरपंतांनीं खराब केलेले कागद शो.. घण्याच्या वेळेस सूटर साहेब हजर नव्हते आणि पट्यांतून सोमल काढला त्यावेळे सही ते हजर नव्हते. रावजीच्या मार्गे एक सारखी ओरड झाली होती कीं, वि- षाचा नाशकर आणि पत्ता हाती लागेल असें कांहीं एक ठेवू नको; परंतु त्या सोमला.. च्या पुडी भोंवतीं इतकें धुके पसरलें होतें कीं, त्यात त्याचे मन अगदीं लुप्त होऊम. गेले आणि त्यास सोमलाच्या पुडीचा विसर पडला; परंतु अकबर अल्लीची बुद्धी त्या स पाहिजेल त्या संकटांतून निभावून नेणारी आहे आणि कदाचित त्याप्रसंगी खदानीं लास मदत केली असेल. अकबर, सूटर साहेब यांस ह्मणतों कीं, कांहीं भुकी पट्यांत ठेविली असेल तर त्यांत कांहीं नवल नाहीं सूटरसाहेब त्यास म्हणतात कीं तर मग तू पटचाचा चांगला शोध कर, आणि त्यांचा अकबर अल्लीवर इतका विश्वास होता कीं ते त्या- 66 पट्टा आणण्याकरितां पाठवितात.मी असे विचारतों की अकबर याजबरोबर सूटरसा- हेब कां गेलें नाहींत ? अकबर यानें फार उपयोगाची सूचना केली होती. तो पट्टा कौतुक संग्रहांत ठेवला पाहिजे आणि त्याच्याजवळ अकबर यास बसविले पाहिजे, तो पट्टा फार चमत्कारिक आहे जेव्हां अकबर यांस वाटलें कीं पट्टयांत पुड़ी आहे तेव्हां त्या पुडींत सोमल आहे असे त्यास जसे काय खदानेंच सांगितले होते; तेव्हां तो लागलीच सूटरसाहेबांस बोलाऊं पाठवितो आणि सुटरसाहेब म्हणतात. इश्वर साह्य करो हा काय सोमल आहे". मला खातरजमेनें असे वाटतें कीं सूटरसाहेब यांनीं अकबर अल्ली यांस बुद्धिपुरस्कार मोकळा सोडला. त्यांस माहीत. होतें कीं हा मनुष्य पराकाष्ठेचा निःशक आहे आणि त्यांची खातरी होती कीं पट्यांतून कांहीं तरी निघेल. मी उघडकरून दाखविले आहे कीं, दामोदरपंत यास. सोमल आणि हिण्याची भुकी मिळाली नाहीं. मीं असें. दाखवून दिले आहे की पच्चाच्या संबंधाने रावजीची हकीकत हास्यजनक गोष्टींत देखील असंमजसपणाची आहे. मीं असे दाखविलें आहे की दामोपरपंताने कुपीविषयों सांगितलें तोपर्यंत रावजी- ने त्याबद्दल कांहीं सांगितले नव्हतें; रावजी या भुक्यांचा अमुक रीतीने उपयोग केला. ह्मणून सागतो आणि कोर्टापुढे शपथ वाहून सांगतांना निराळ्याच रीतीनें उपयोग केल्याविषयीं सांगतो. नंतर शुद्ध सोमलाचा एक कागद पच्चांतून काढून दाखवितो, अशी ही हकीकत आहे. तर्कशक्ती संपन्न लोक साजविषयी काही संशय न घेतां ती खरी मानतील आणि याविषयीं कांहीं बारीक विचार करणार नाहीत; परंतु जर ही गोष्ट अकबरअल्लीसारख्या मनुष्याने सांगितली आहे तर त्यांत सगळी लबाडी आहे. आणि ह्मणून मी या कामिशनापुढे आणि अलम दुनयेपुढे अकबरअल्लीवर असा अरोप ठेवतों की त्या पट्यांत ती पुढी त्यानेच ठेविली आणि नंतर पट्यांतून ती पुडी, निघाली, असे खरे करून दाखविण्याकरितां सुटर साहेब यांस बोलावलें. रावजीच्या,