पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारजंट बालंटाईनचें भाषण. (२६५ ) कुपी अशा परीमाणाची नव्हती की तींत विष आणि पाणी समावेल. दामोदरपंत ने सांगितलेल्या कुपींत खरोखर काहीं तरी जादुगिरीचे द्रव्य होतें कारण जरी या वि षयावर मोठ्या शास्त्रज्ञांनी आपला अभिप्राय दिला आहे, तरी ही गोष्ट मला अग- दीं विश्वासार्ह वाटतें की त्या कुपींतील द्रव्य यहच्छेकरून पाझरले असतां त्यापासू न फोड येईल. जर मनुष्याने सोमल हाताने जठरावर घांसला तर त्यापासून फोड उ ठेल परंतु तोंड बंद केलेल्या कुर्पीतून सहजरित्या सोमल बाहेर आला असता त्याज- पासून फोड उठेल हे तर माझ्या समजूतीच्या बाहेर आहे. पण डाकर घे यांनी मो. ठ्या गंभीर मुद्रेनें आपणास सांगितले आहे की, कुपीतील प्रवाही पदार्थ अगदी थो डा पाझरला असतां त्यापासून फोड येईल तर मग तसे होणार नाहीं असें ह्मणणारा या जगांत कोण आहे ? चीफ जस्टिस महाराज, ह्या गोष्टीपासून मला एका गोष्टीचें स्मरण होते आणि -नि:संशय आपणासही ती स्मरते. आपल्या धंद्यांतील अतिशय मोठ्या योग्यतेच्या एका बारिस्टरास एका डाक्टराने असा अभिप्राय देऊन फसविलें कीं, सीताफळ खाल्यापासून विषाची बाधा होते; कारण की, त्या मृत मनुष्याच्या पोटांत त्याची बी निघाली; आणि तेव्हांपासून गडाक्टराचें " सीताफळाची बी " असे टोपण नांव पडले. त्याप्रमाणे डाक्टर ग्रे यांचे नांव त्या हिंदूच्या जठरावरील फोडास जोडलें पाहिजे. डाक्टर ग्रे यांच्या मुखावरील गांभिर्यावरून अशी आशा उत्पन्न झाली होती की, या मुकदम्यांत निदान एक तरी साक्षीदार चांगल्या अब्रूचा निघेल परंतु शेवटी त्यांनी देखील मला फसविलें. ती शिशी जर डाक्टर ग्रे यांच्या हातांत गेली अस- तो तर तिजमधील प्रवाही सहजरित्या पाझरला असतां. जठरावर त्यापासून फोड उ- ठले असा त्याजमध्ये गुण होता है त्यांनी प्रत्ययास आणून दिलें असतें. मुकदम्यांत ही गोष्ट हांसन जाऊ देतां आली असती परंतु ज्यांच्या पुराव्यावर वि श्वास ठेवून एका राजास गादीवरून काढून टाकण्यात आले आहे त्याचा असा मू. र्खपणा अलक्ष करण्यास पात्र नाहीं. खरोखर डाक्टर ग्रे यांचा पुरावा प्रामाणिक आणि मोठ्या मनुष्याने तपासला पाहिजे होता. साधारण आतां मी रावजी याचा मुकदम्यांतील दुसया गोष्टीशी संबंध आहे त्याविषयीं वि- चार करतों. दामोदरपंत यानें विषाच्या पुड्या सालम किंवा यशवंतराव याजबरोबर रावजीकडे पाठविल्या असेही सांगितलें आहे व महाराजांनी त्या त्यांस समक्ष दिल्या अर्सेही सांगितले आहे. त्याविषयीं सूटर साहेब यांजपाशीं रावजीनें हकीकत सांगितली ती अशी "साळम आणि यशवंतराव असें ह्मणून आमचें मन वळवि ण्यास प्रवृत्त झाले कीं जर तुमी महाराजांच्या इच्छेस अनुसराल तर मग तुझांस चाकरी करण्याची गरज राहणार नाही, महाराज तुमची व तुमच्या कुटुंबाची जन्मा- ची बेगमी करून देतील व तुझांस असाम्या करून देतील. आणि त्या खेरीज तें काम सिद्धिस गेल्याबरोबर प्रत्येकांस एक एक लक्ष रुपये देतील – तें काम सिद्धि स गेल्याबरोबर ह्मणजे रेसिडेंटाचा मृत्यू घडल्या बरोबर आह्मी तें स्वार्थसाधक ३१